*कोकण Express*
*आनंदी आयुष्यासाठी सुदृढ शरीर महत्वाचे – ब्रिगे. सुधीर *
*फोंडाघाट येथे कबड्डी प्रशिक्षण शिबीर संपन्न*
*कणकवली ः प्रतिनिधी*
फोंडाघाट येथे फोंडाघाट एज्युकेशन संस्था आणि फोंडा पंचक्रोशी व आजाद स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने कबड्डी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणाला कोच हेमंत सावंत हे राष्ट्रीय स्तरावर खेळलेले, यांनी मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षण १८ ते २५ तारीख पर्यंत घेतले गेले. या शिबिरासाठी आजाद स्पोर्ट्स क्लब व फोंडा पंचक्रोशी संघातील खेळाडूंनी मेहनत घेतली.
समारोप प्रसंगी ब्रिगेडियर सुधीर सावंत, संदेश पटेल संस्था अध्यक्ष सुभाष सावंत, मुख्याध्यापक सावंत सर, दीपक इस्वलकर, भूपेश राणे, अमित चव्हाण, अमित पारकर, महेश भोगले आदी उपस्थित होते. आनंदी आयुष्यासाठी पेक्षा सुदृढ शरीर गरजेचे असते ते खेळा मूळे प्राप्त होते. ग्रामीण खेळाच्या उन्नती साठी सैनिक फेडरेशन च्या माध्यमातून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन सुधीर सावंत यांनी दिले. यावेळी संदेश पटेल, सुभाष सावंत भूपेश राणे आदींनी मुलांना मार्गदर्शन केले.