*कोकण Express*
*वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (संयुक्त) कट्टा येथे कै.डॉ.काकासाहेब वराडकर यांची 46 वी पुण्यतिथी साजरी*
डॉ. काकासाहेब वराडकर यांनी 15 विद्यार्थी घेऊन सुरू केलेल्या प्रशालेमध्ये आज एकूण 1000 विद्यार्थी ज्ञानार्जना चे कार्य करत आहेत. दीन ,दुर्बल,दलित सामान्यांच्या उद्धारासाठी शिक्षणाचे व्रत अंगीकारून आज सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या काका साहेबांचा एक मी सामान्य कार्यकर्ता असून ज्ञान सेवेच्या व्रताची ही ज्योत मी कायमपणे तेवत ठेवीन असे उदगार कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री सुनील नाईक यांनी कार्यक्रम प्रसंगी केले. डॉ.काकासाहेब वराडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून व प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रम प्रसंगी “मी काकासाहेब वराडकर बोलतोय” या एकपात्री अभिनयातून इ.९ वी चा अनिरुद्ध किसन हडलगेकर या विद्यार्थ्यांने काकासाहेबांनी पुकारलेल्या शैक्षणिक, सामाजिक चळवळीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला व भविष्यात अमृत महोत्सव शाळेच्या उपक्रमाबद्दल तसेच माजी विद्यार्थ्याबद्दल आपला संदेश दिला. तसेच तालुका विज्ञान प्रदर्शनातील उच्च प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक मिळवलेल्या कुमारी हर्षिता प्रकाश कानूरकर हिने आपल्या विज्ञान प्रतिकृती चे सादरीकरण क.पं. शि.प्र.मंडळ कट्टा चे पदाधिकारी व विद्यार्थी यांच्यासमोर केले. यावेळी डॉ. काकासाहेब वराडकर यांच्या जीवनावर व त्यांच्या कार्याची माहिती भाषणा च्या माध्यमातून कुमारी निकिता श्रीकांत मेस्त्री. कुमारी विष्णू पेडणेकर ,कुमारी आर्या निलेश राऊळ, रूपाली वांगणकर ,उज्वला पराडकर ,धृवी भाट या विद्यार्थिनींनी करून दिली.वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (संयुक्त) कट्टा .वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा, डॉ.दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय (सं) कट्टा या तिन्ही विभागाच्या विद्यार्थ्यांनी काका साहेबांचा संदेश आपल्या भाषणातून दिला. यानंतर “सुरक्षा ही रक्षा है” ही विज्ञान नाटिका सादर करण्यात आली. कोकणातील दशावतार या लोककलेचा आधार घेऊन दशावतारातील पात्रांच्या माध्यमातून कोरोना या रोगांनी घातलेले थैमान व त्याच्या वरील उपाय यावर आधारित वैज्ञानिक प्रबोधन या नाटिकेतून करण्यात आले. नाटिकी चे कथा संवाद लेखन प्रशालाचे मुख्याध्यापक श्री .संजय नाईक यांनी केले. नाटिका दिग्दर्शन म्हणून विज्ञान प्रमुख महेश भाट, नेपथ्य श्री किशन हडलगेकर, श्री एकनाथ राऊळ यांनी केले वेशभूषा श्री. भूषण गावडे तर संगीत साथ श्री रामकृष्ण सावंत, कु .सोहम तांडेल, कु .गौरव गावडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुधीर वराडकर, सचिव श्री सुनील नाईक ,माजी मुख्याध्यापक वराडकर हायस्कूल कट्टा चे श्री अनिल फणसेकर, वराडकर हायकुल व कनिष्ठ महाविद्यालय (सं) कट्टा चे श्री संजय नाईक , वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल चे मुख्याध्यापक श्री ऋषी नाईक, डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे श्री जमदाडे शालेय संसद अधिपती श्री किसन हडलगेकर . श्री रामकृष्ण अंकुश सावंत शालेय संसद पंतप्रधान कुमारी सई ताम्हणकर, उपपंतप्रधान श्रेया चांदरकर सर्व शालेय संसद मंत्री तसेच तिन्ही विभागाचे सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते.