*कोकण Express*
*शिवसेनेच्या घावनळे माजी जि.प.सदस्या अनुप्रिया खोचरे सह मालवण हडी शिवसेना शाखाप्रमुखसह वैभववाडी माजी उपतालुकाप्रमुख शिंदे गटात दाखल..*
*सिंधुदुर्ग*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाकडून एकापाठोपाठ एक धक्कातंत्र सुरू असून शिवसेना शिंदे गटाला समर्थन देणाऱ्या शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये वाढ होत आहे. आज रत्नागिरीमध्ये राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांनी शिवसेना शिंदे गटाला जाहीर समर्थन दिले. यामध्ये कुडाळमधील शिवसेनेच्या माजी जि. प. सदस्य अनुप्रिया खोचरे यांच्यासह शिवसेनेच्या महिला शाखा प्रमुख भक्ती खोचरे, अनिल खोचरे, सीताराम खोचरे, गौरव नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गटाला जाहीर समर्थन दिले. तर वैभववाडी तालुक्यातील विश्राम राणे व नंदकिशोर रावराणे यांनी देखील उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटाला समर्थन दिले. तर मालवण तालुक्यातील हडीचे शाखाप्रमुख राजा तोंडवळकर, भारती घारकर, शेखर तोडणकर आदींनी शिंदे गटाला साथ दिली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या सर्वांचे स्वागत केले. यावेळी भास्कर राणे, बबन शिंदे, माजी नगरसेवक भूषण परूळेकर, बाबू नाटेकर, माजी जि. प. सदस्य संजय आंग्रे, माजी सभापती संदेश पटेल, अरुण तोडणकर, विशाल गावकर, किसन मांजरेकर, राजा गावकर आदि उपस्थित होते.