*कोकण Express*
*मोदींच्या जीवन प्रवासातून नव्या पिढीने प्रेरणा घ्यावी…*
*राजन तेली;सावंतवाडी येथे आयोजित चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा उलगडा झाला पाहिजे.त्याच्या कार्याची प्रेरणा घेवून तरुणाईने आपले जीवन यशस्वी करणे गरजेचे आहे,असे मत भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे व्यक्त केले.
सावंतवाडी भाजपाच्या माध्यमातून येथील श्रीराम वाचन मंदीरात मोदींच्या कार्याच्या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दोन दिवस चालणार आहे. आज या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री.तेेली यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे,माजी नगराध्यक्ष संजू परब,वेंगुर्ल्याचे राजन गिरप,राजू बेग,मनोज नाईक,चंद्रकात जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी श्री.तेली पुढे म्हणाले, या ठिकाणी मोंदीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.यात रक्तदान शिबीर तसेच क्षयरोग असलेल्या रुग्णांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. याचा फायदा येथील सर्वसामान्य लोकांना व्हावा, हा या मागचा उद्देश्य आहे.या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनात युवा पिढीने प्रेरणा घ्यावी.यामधून निश्चितच काही तरी शिकायला मिळेल.श्री.परब म्हणाले,मोदींचे कार्य महान आहे. चित्र प्रदर्शनातून ते लोकांपर्यत मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचा फायदा येथील युवक-युवतींनी घ्यावा,आणि आपला प्रवास बळकट करण्याचा प्रयत्न करावा.
यावेळी निरवडे माजी सरपंच प्रमोद गावडे,मळगावचे हनुमंत पेडणेकर,दिपाली भालेकर,प्राजक्ता केळुसकर,केतन आजगावकर,अनिल सावंत,पिट्या सावंत,विनोद सावंत,दिलीप भालेकर,अजय सावंत,अमित परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.