*कोकण Express*
*विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ व रामेश्वर ग्रामपंचायत आयोजित स्वच्छता अभियान*
*कासार्डे ः संजय भोसले*
विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ व रामेश्वर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने 26 सप्टेंबर रोजी स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर ऐतिहासिक शिवकालीन विहीर (पोखरबाव) मोकळा श्वास घेईल. या अभियानामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
रामेश्वर गावातील शिवकालीन ऐतिहासिक (पोखरबाव) विहीर रामेश्वर ग्रामपंचायत आणि विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ, विजयदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने साफ-सफाई केली जाणार आहे. रामेश्वर गावातील ही शिवकालीन विहीर अनेक वर्षे झाडा-झुडुपांमध्ये दिसेनाशी झाली आहे. ह्या विहिरीची साफसफाई करून एक ऐतिहासिक ठेवा लोकांसमोर आणण्याचा एक प्रयत्न सर्व शिवप्रेमी ग्रामस्थ करणार आहेत.
या स्वच्छता अभियानात ज्यांना मदत करायची आहे अश्या सर्व शिवप्रेमी मंडळांना आवाहन करण्यात आले आहे कि, 26 सप्टेंबर रोजी दुपारी ठिक 3.00 वाजता रामेश्वर स्टॉप जवळ जमा होऊन ह्या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी राजेन्द्र रघुनाथ परुळेकर
(8080597276), रामेश्वर सरपंच विनोद सुके (9309579969) यांच्याशी संपर्क साधावा.