आंतरराष्ट्रीय स्वरप्रभा ख्याल गायन स्पर्धेत

आंतरराष्ट्रीय स्वरप्रभा ख्याल गायन स्पर्धेत

*कोकण Express*

*आंतरराष्ट्रीय स्वरप्रभा ख्याल गायन स्पर्धेत* 

*देवगडच्या सावनी शेवडे हिला विशेष पारितोषिक*

*कासार्डे ः  संजय भोसले*

गानवर्धन पुणे व स्वरमयी गुरुकुल आयोजित आंतरराष्ट्रीय स्वरप्रभा ख्याल गायन स्पर्धेत देवगड येथील सावनी शेवडे हिला विशेष पारितोषिक मिळाले आहे. हा पारितोषिक सोहळा टिळक स्मारक मंदिर पुणे येथे पार पडला. याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

यावेळी ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे, ज्येष्ठ मराठी चित्रपट दिग्दर्शक राजदत्त आणि शैक्षणिक विचारवंत डॉ. शां. बां. मुजुमदार, विदुषी कलापिनी कोमकली उपस्थित होते. ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या संगीतरचनेवर आयोजित ही स्पर्धा घेण्यात आली होती. यात देश-विदेशातून अनेक सहभागी स्पर्धकांनी भाग घेतला होता. यावर्षी प्रभाताई यांचे 90 वे जन्मवर्ष असल्याने व याच वर्षी त्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने गौरविल्याने ही स्पर्धा माझ्यासाठी खूप जवळची होती तसेच लहानपणापासून प्रभाताईंच्या गाण्याने खूप प्रभावित होते असे मत सावनी शेवडे यांनी व्यक्त केले. या पारितोषिकामुळे सिंधुदुर्ग मधील कलारसिकांकडून तिचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!