नवरात्रौत्सवानिमीत्त कासार्डे तिठ्ठा येथे विविध धार्मिक,सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

नवरात्रौत्सवानिमीत्त कासार्डे तिठ्ठा येथे विविध धार्मिक,सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

*कोकण Express*

*नवरात्रौत्सवानिमीत्त कासार्डे तिठ्ठा येथे विविध धार्मिक,सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन*

*कासार्डे ःःसंजय भोसले* 

श्री.सिध्दीविनायक नवरात्र उत्सव मंडळ, कासार्डे यांच्यावतीने नवरात्रोत्सव रविवार दि. २५ सप्टे. ते गुरुवार दि.६ ऑक्टो. २०२२ पर्यंत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजित आयोजन करण्यात आला असून यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त रविवार दि.- २५ सप्टे. रोजी सायं. ४ : ०० वा. कासार्डे भोगले पारकरवाडी ते कासार्डे ‍तिठठा श्री.दुर्गा मूर्ती आगमन सोहळा तसेच सोमवार दि.- २६ सप्टे. स. १० : ०० वा. श्री. दुर्गा मूर्तीची प्रतिष्ठापना, सायं.७:०० वा. बुवा कु.आर्या गणेश घाडी, तळेरे घाडीवाडी  भजन, मंगळवार २७ सप्टे. सायं.७:०० वाआवळेश्वर प्रासा. भजन मंडळ, कासार्डे  बुवा.श्री.विजय पताडे याचे भजन, बुधवार २८ सप्टे. २०२२ स्वयंभू प्रासा. भजन मंडळ,पियाळी बुवा. श्री.संतोष कानडे भजन,गुरुवार २९ सप्टे. ३:०० वा. कासार्डे केंद्रातील प्राथमिक शाळांतील मुलांची ग्रुप डान्स स्पर्धा,सायं. ७:०० वा.  श्री.गांगेश्वर प्रासा.भजन मंडळ,तळेरे बुवा.श्री.संतोष तळेकर भजन,  रात्रौ.९:०० वा. सांघिक वेशभूषा स्पर्धा , शुक्रवार ३० सप्टे. सायं.७:०० वा.  साईनाथ प्रासा.भजन मंडळ, ओझरम बुवा.श्री.सुधाकर राणे भजन,  रात्रौ.९:०० वा. वैयक्तीक वेशभूषा स्पर्धा,शनिवार १ ऑक्टो.स. ८:०० वा.  रक्तदान शिबीर दु. ३:०० वा. श्री खापरादेवी फुगडी मंडळ ओझरम मापारवाडी याचे फुगडी नुत्य,दुपारी ३:३० वा. सिंधुदुर्गचे भावोजी श्री.बाळू वालावलकर,कणकवली याच्या निवेदनांने खास महीलांसाठी होम मिनिस्टर,सायं.७:०० वा. जय हनुमान प्रासा. भजन मंडळ,तळेरे वाघाचीवाडी बुवा.श्री.आकाश वळंजू याचे भजन होणार आहे.तसेच रविवार २ ऑक्टो. सायं ७:०० वा. अष्टविनायक प्रासा.भजन मंडळ,बावशी  बुवा.श्री.ओंकार नार्वेकर भजन,

सोमवार ३ ऑक्टो. दुर्गाष्टमी निमित्त .१०:०० वा. श्री.सत्यनारायण महापूजा, दु. १ ते ३ वा.भंडारा (महाप्रसाद), दु. ३ : ०० वा. हळदीकुंकु समारंभ व श्री.देव भैरव जोगेश्वरी महीला फुगडी मंडळ,कुडाळ(भैरववाडी) फुगडी नुत्य  सायं.६:०० वा. दत्तात्रय प्रासा.भजन मंडळ,कासार्डे भोगले पारकरवाडी बुवा. श्री.प्रकाश पारकर भजन सायं. ७:००  वा.स्वयंभू प्रासा.भजन मंडळ, कासार्डे द.गावठण बुवा श्री.प्रकाश पाताडे भजन,  रात्रौ.८:०० वा. ढोलवादन स्पर्धा,  मंगळवार ४ ऑक्टो. सायं.७:०० वा. स्वयंभू प्रासा.भजन मंडळ,कासार्डे उ.गावठण बुवा.श्री.संजय पाताडे भजन,  बुधवार  ५ ऑक्टो. सायं.७:०० वा. जय हनुमान प्रासा. भजन मंडळ,ओझरम तळीवाडी भजन बुवा.श्री.संतोष राणे भजन होणार असून गुरुवार  ६ ऑक्टो. सायं. ५ : ०० वा. कासार्डे तिठठा ते कासार्डे जांभूळवाडी गणेश कोंड अशी श्री.दुर्गामूर्ती विसर्जन मिरवणूक होऊन कार्यक्रमांची सांगता होणार आहे तरी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष सहदेव उर्फ आण्णा खाडये यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!