शिवसेना शाखाप्रमुख चंदू रावराणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

शिवसेना शाखाप्रमुख चंदू रावराणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

*कोकण Express*

*शिवसेना शाखाप्रमुख चंदू रावराणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते उद्घाटन*

आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून चंदू रावराणे मित्रमंडळ यांनी लोरे सारख्या ग्रामीण भागात कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य विषयक विविध उपक्रम राबवुन सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्या कर्तृत्वाचा वेगळा आदर्श समाजासमोर ठेवलाआहे. त्यांचे समाजसेवेचे हे कार्य सर्वांनाच प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केले.
ते प्राथमिक आरोग्य केंद्र, फोंडाघाट येथे चंदू रावराणे मित्रमंडळ आयोजित शिवसेना शाखाप्रमुख चंदू रावराणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीर कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ शिवसैनिक आबू पटेल, विभागप्रमुख बाबू रावराणे, युवा विभागप्रमुख सिद्धेश राणे, लोरे नं-२ चे सरपंच विलास नावळे, सुरेश टक्के, बंटी उरणकर, विठ्ठल रावराणे, विजय जामदार, वैद्यकीय अधिकारी डॉ. जंगम, दीपक ईस्वलकर, संजना कोलते, काशीराम नवले, चंदू सुतार, प्रितम रावराणे आदी उपस्थित होते.
चंदू रावराणे मित्र मंडळ रक्तदानासारखे कार्य सलग ७ वर्षे राबवत असून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करीत आहे. निश्चितच समाजासाठी एक वेगळा आदर्श मंडळाने निर्माण केला आहे. असेही श्री.नाईक यावेळी म्हणाले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला श्री.सुशांत नाईक यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सुशांत नाईक यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी‌ चंदू रावराणे मित्रमंडळाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!