*कोकण Express*
*वैभववाडी तालुक्यातील खांबाळे बीएसएनल मोबाईल टॉवरवर 4 G सेवा व जनरेटर ची सुविधा उपलब्ध करून मिळावी*
*शिवसेना तालुका प्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांची मागणी*
*खासदार विनायक राऊत यांनी वेधले बीएसएनएल जिल्हा प्रबंधक यांचे लक्ष*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
खांबाळे येथील बीएसएनएल टॉवर ला जनरेटर ची सुविधा उपलब्ध नसल्याने लाईट गेल्यावर मोबाईल रेंज सुध्दा जाते त्यामुळे मोबाईल ला रेंज उपलब्ध होत नाही.
गावात तसेच पंचक्रोशीत बीएसएनल चे असंख्य ग्राहक असल्यामुळे याचा त्रास लोकांना होत आहे. तसेच सदर मोबाइल टॉवर वर 4 G सेवा व जनरेटरची सेवा उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी खांबाळे गावच्या ग्रामस्थांच्या वतीने शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे कडे केली होती त्याची खासदार महोदयांनी दखल घेतली असून जिल्हा प्रबंधक बीएस एन एल सावंतवाडी यांना लेखी पत्र दिले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या मधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.