*कोंकण Express*
*रोजगार एकता मंचच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्यातील युवक युवती एकत्र आले ही जिल्ह्यासाठी आदर्शवत पाऊल*
*तुम्ही रोजगारासाठी एकत्र या,मी तुमच्याशी संवाद साधायला तिलारीत येतो*
*शालेय शिक्षणमंत्री ना.दीपक केसरकर यांची ग्वाही*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
रोजगार एकता मंचच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्यातील युवक युवती एकत्र आले ही जिल्ह्यासाठी आदर्शवत पाऊल आहे.लवकरच तिलारी येथे हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येईल.तुम्ही रोजगारासाठी एकत्र या,मी तुमच्याशी संवाद साधायला तिलारीत येतो अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री ना.दीपक केसरकर यांनी दोडामार्ग तालुका रोजगार एकता मंचला दिले.यावेळी त्यांनी या मंचचे अभिनंदन करीत रोजगार देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट केले.
दोडामार्ग तालुक्यातील पर्यटनाच्या माध्यमातून येथील युवकांना रोजगार मिळावा यासाठी तालुक्यातील युवक युवतींनी एकत्र येत रोजगार एकता मंचची स्थापना केली आहे.सरकारने याकडे लक्ष देऊन रोजगार द्यावा अशी मागणी या मंचची होती.
दरम्यान आज आपल्या व्यस्त दौऱ्यातही असणाऱ्या शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या एकता मंचच्या शिष्टमंडळाला विशेष वेळ देत त्यांच्याशी संवाद साधला.
ना.केसरकर यांनी या सर्वांशी संवाद साधत सविस्तर माहिती घेत तिलारी येथे चर्चेसाठी येण्याची ग्वाही दिली.