उच्च न्यायालयाच्या निर्णया नंतर कणकवलीत शिवसेनेकडून जल्लोष

उच्च न्यायालयाच्या निर्णया नंतर कणकवलीत शिवसेनेकडून जल्लोष

*कोकण  Express*

*उच्च न्यायालयाच्या निर्णया नंतर कणकवलीत शिवसेनेकडून जल्लोष*

*जोरदार घोषणाबाजी देत फटाके लावून केला आनंद व्यक्त*

*शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होणार असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह

*कणकवली ः प्रतिनिधी*

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर राज्यभरात शिवसैनिकांमधून जल्लोष साजरा केला जात आहे . या निर्णयाचे पडसाद कणकवलीत देखील उमटले असून, कणकवलीत श्रीधर नाईक चौक येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत जोरदार घोषणाबाजी दिली व आनंद साजरा केला. यावेळी उद्धव ठाकरे आगे बढो ज्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजु शेट्ये, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, नवरात्रोत्सव समिती अध्यक्ष रामदास वीखाळे, नगरसेवक कन्हैया पारकर, अँड.हर्षद गावडे, महेश कोदे, रुपेश आमडोसकर, प्रसाद अंधारी, प्रदीप मसुरकर, अरुण परब, सचिन आचरेकर, विलास गुडेकर, किरण वर्दम, सोहम वाळके, प्रशांत वनस्कर, निकेतन भिसे, बाबु केनी, सचिन राणे, महेश कोदे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!