*कोकण Express*
*सर्व सामान्यासाठी काम करणारे व अनेक बिरुदावलीने नटलेलं व्यक्तिमत्व म्हणजे बॅ. नाथ पै होय – भरत गावडे*
*सर्व सामान्यासाठी काम करणारे व अनेक बिरुदावलीने नटलेलं व्यक्तिमत्व म्हणजे बॅ. नाथ पै होय – भरत गावडे*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
बॅ.नाथ पै हे सर्व सामान्यासाठी काम करणारे व अनेक बिरुदावलीने नटलेले व्यक्तिमत्त्व होते असे प्रतिपादन नाथ पै यांच्या कार्याचे गाडे अभ्यासक व सेवानिवृत्त शिक्षक भरत गावडे यांनी शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय साळगाव येथे व्याख्यान केले. यावेळी व्यासपीठावर पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रा.सुभाष गोवेकर, संस्था सचिव व माजी मुख्याध्यापक मुकुंद धुरी, मुख्याध्यापक सलीम तकीलदार, सहा.शिक्षिका अर्चना चव्हाण, सहा. शिक्षक विश्वास धुरी, सहा. विद्यानंद पिळणकर, सहा.शिक्षक आनंद हळदणकर, सहा.शिक्षिका सुप्रिया पेडणेकर, सहा.शिक्षक राहुल कानडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात स्वागतगीत व नाथ पै यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी आपल्या ओघवत्या भाषाशैलीत विद्यार्थ्यांना नाथ पै यांच्या कार्याची ओळख करून देताना भरत गावडे म्हणाले की नाथ पै यांनी आपल्याला सृष्टीचे मित्र बना, माडाच्या झाडासारख्ये कणखर व्हा, न्यूनगंड बाजूला करून चांगले छंद जोपासा ,वाचनावर भर द्या व्यसनाधीनतेपासून दूर रहा मोबाईलचा वापर कमी करा आणि असं झालं तर आपल्याला नाथ पै सारख्या महान व्यक्तीचे विचार आपल्या आचरणात आणता येतील व समाजात परिवर्तनाची नवीन चळवळ उभी राहायला वेळ लागणार नाही असे सांगितले.
यावेळी प्रा.सुभाष गोवेकर यांनी कोकणचे रत्न म्हणजे नाथ पै होय अशी मोठी माणसं विचाराने आपल्यासोबत नेहमी असतात अश्या महान लोकांचे विचार आपण सर्व सामान्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करूया असे याप्रसंगी सांगितले.
यावेळी संस्था सचिव मुकुंद धुरी यांनी नाथ पै यांच्या कार्याचा आढावा घेताना ब्या. नाथ पै यांनी कोकणातील व महाराष्ट्रातील समस्या संसदेत प्रभावीपणे मांडण्याचे काम केले त्यामुळे खऱ्या आर्थाने कोकणच्या विकासाला चालना मिळाली व अश्या लोकांचे विचार आपण अंगिकारले पाहिजेत असे सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनची नाथ पै यांच्या जीवनावर आधारित तोंडी प्रश्न विचारून यशस्वी झालेल्या सानिका डिचोलकर, स्वानंदी सामंत, शांताराम वारंग, दुर्वा धुरी, परेश जांभळे, हर्षद झोरे, सायली डिचोलकर या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमांचे प्रस्ताविक व परिचय मुख्याध्यापक सलीम तकीलदार यांनी व आभारप्रदर्शन परशुराम नार्वेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षक एकनाथ कांबळे यांनी केले.

