*कोकण Express*
*श्रद्धा कदम यांना विमा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग पाच वर्षे विमा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार (MDRT) प्राप्त करणाऱ्या कणकवली येथील विमा प्रतिनिधी श्रद्धा कदम यांचा सत्कार कोल्हापूर विभागाचे सीनियर डिव्हिजन मॅनेजर अभय कुलकर्णी करण्यात आला. यावेळी कणकवली शाखाधिकारी सतेजा बोवलेकर,विकास अधिकारी श्रीनिवास पळसुले आदी उपस्थित होते.
सौ. कदम गेली २५ वर्षे विमा क्षेत्रातून जनसेवा करत आहेत. खडतर मेहनत चिकाटी आणि निरलस सेवा वृत्तीच्या जोरावर त्यांनी सामान्य जनतेपासून उच्चस्तरीय जनतेपर्यंत विमा क्षेत्रात आपली विश्वासहर्ता निर्माण केली. सलग पाच वर्ष विमा क्षेत्रातील हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळून सिंधुदुर्गात विमा क्षेत्रात प्रथम स्थान पटकाविले आहे. गेली पाच वर्ष त्या डिव्हिजन मध्ये पहिल्या पाच क्रमांकात असून शाखेत पहिल्या क्रमांकावर आहेत.