फोंडाघाट नवीन कुर्ली येथे सार्वजनिक नवरात्रोत्सव

फोंडाघाट नवीन कुर्ली येथे सार्वजनिक नवरात्रोत्सव

*कोकण Express*

*फोंडाघाट नवीन कुर्ली येथे सार्वजनिक नवरात्रोत्सव*

*नवदुर्गा युवा मंडळाकडुन सलग २० व्या वर्षी कार्यक्रमाचे आयोजन*

*देवीची प्रतिष्ठापना करुन विविध कार्यक्रम*

*फोंडाघाट ः प्रतिनिधी*

फोंडाघाट नवीन कुर्ली येथे भवानी मैदानावर सार्वजनिक नवरात्रोत्सवानिम्मित देवी दुर्गामातेची प्रतिष्ठापना करुन शारदीय नवरात्रारंभ सोमवार दि.२६ सप्टें. २०२२ ते विजयादशमी दसरा ते बुधवार दि.०५ ऑक्टो. २०२२ या कालावधीत विविध सांस्कृतिक, धार्मिक, तसेच सामाजिक उपक्रमाने कार्यक्रम साजरा होणार आहे.
यामध्ये सोमवार दि.२६ सप्टें. सकाळी १०.०० वा. देवीचे आगमन, देवीची प्रतिष्ठापना, घटस्थापना, पुजा, आरती. सायं. ०७:०० वा. कुर्लादेवी प्रासा.भजन मंडळ नवीन कुर्ली बुवा- अमित दळवी याचे भजन,आरती. रात्रौ ०८:०० वा. जय मल्हार मित्रमंडळ यांचा गजनृत्य- गजा रात्रौ ०९:०० वा. दांडिया नृत्य. मंगळवार दि.२७ सप्टें. रोजी सकाळी १०:०० वा. सत्यनारायण महापुजा सायं. ०७:०० वा. ह.भ.प.विजय नारायण मेस्त्री व सहकारी यांचा हरिपाठ. रात्रौ ०९:०० वा. दांडिया नृत्य. बुधवार दि.२८ सप्टें. सकाळी ०९:०० वा. रक्तदान शिबीर तसेच सांय. ०७:०० वा. केळोबा प्रासा. भजन मंडऴ फोंडाघाट याचे भजन,आरती. रात्रौ. ०९:०० वा. दांडिया नृत्य. गुरुवार दि.२९ सप्टें. सायं. ०४:०० वा. महिलांकरीता हळदिकुंक, सायं. ०६:०० वा. महिलाकरीता विविध सांस्कृतिक कार्यक्रम व फुगडी नृत्य. सायं. ०७:०० वा. कालिका माता फुगडी गृप बोर्डवे यांचे फुगडी नृत्य, रात्रौ ०९:०० वा. दांडिया नृत्य. शुक्रवार दि.३० सप्टें. सायं. ०७:०० वा. लिंगेश्वर प्रासा. भजन मंडळ जानवली बुवा रविकांत राणे यांचे भजन, आरती, रात्रौ ०९:०० वा. दांडिया नृत्य. दि.०१ ऑक्टो. सायं. ०७:०० वा. पावणादेवी प्रासा. भजन मंडळ फोंडाघाट बुवा- हेंमत तेली यांचे भजन, रात्रौ. ०८:०० वा. पंचक्रोषी रेकॉर्ड डान्स, वेशभुषा व गीतगायन स्पर्धा, रात्रौ. १०:०० वा. दांडिया नृत्य. रविवार दि. ०२ ऑक्टो. सायं. ०७:०० वा. मालवीर भुतनाथ प्रासा. भजन मंडळ पाळेकरवाडी देवगड बुवा- ऋुतुजा पाळेकर यांचे भजन, रात्रौ ०८:०० वा. मुलांकरीता विविध सांस्कृतिक कार्यक्रम, रात्रौ १०:०० वा. दांडिया नृत्य. सोमवार दि.०३ ऑक्टो. दुपारी १२:३० वा. देवीचा महाप्रसाद, सायं. ०७:०० वा. गांगेश्वर प्रासा. दिंडी भजन नारींग्रे देवगड बुवा- मंगेश घाडी यांचे दिंडी भजन रात्रौ. ०९:०० वा. दांडिया नृत्य. मंगळवार दि.०४ ऑक्टो. रात्रौ. ०९:०० वा. हनुमान प्रासा. भजन मंडळ वर्दे कुडाळ गुरुवर्य अशोक सावंत यांचे शिष्य बुवा- विजय (गुंडु) सावंत × वडची देवी प्रासा. भजन मंडळ लिंगडाळ देवगड गुरुवर्य विजय परब यांचे शिष्य बुवा- संदिप लोके यांचा २०× २० भजनांचा जंगी सामना. बुधवार दि.०५ ऑक्टो. सायं. ०४:०० वा. सोने लुटणे, सायं. ०७:०० वा. श्री. दत्त प्रासा. भजन मंडळ मुंबई बुवा- अनिकेत आरोरकर यांचे भजन, रात्रौ. ०९:०० वा. दांडिया नृत्य, रात्रौ. १०:०० वा. बक्षिस वितरण सोहळा व आभार प्रदर्शन कार्यक्रम. गुरुवार दि.०६ ऑक्टो. दुपारी ०३:०० वा. देवीची उत्तरपुजा व देवीची आरती व सायं. ०४:०० वा. भव्यदिव्य मिरवणुक सोहळा व देवीचे विर्सजन. अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या सर्व कार्यक्रमांचा ग्रामस्थ व भाविक- भक्तांनी लाभ घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवुन सहकार्य करावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रशांत दळवी, सचिव अविनाश चव्हाण व संचालक मंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!