शेवटच्या रात्री बाळ गोपाळ मंडळाचा “शेगावीचा राणा ” देखावा सादर करून फोंडाघाट हरिनाम सप्ताहाची सांगता

शेवटच्या रात्री बाळ गोपाळ मंडळाचा “शेगावीचा राणा ” देखावा सादर करून फोंडाघाट हरिनाम सप्ताहाची सांगता

*कोकण Express*

*शेवटच्या रात्री बाळ गोपाळ मंडळाचा “शेगावीचा राणा ” देखावा सादर करून फोंडाघाट हरिनाम सप्ताहाची सांगता*

*फोंडाघाट ः प्रतिनिधी*

श्री देव राधाकृष्ण मंदिर फोंडाघाटच्या “अखंड हरिनाम सप्ताह” त अखेरच्या दिवशी, बाल गोपाळ मंडळाच्या वतीने श्रीदेवी माऊली दिंडी पथक- रेडी, यांनी ट्रिक्स सीन वर आधारित, शेगावीच्या गजानन महाराज यांच्या जीवनातील चमत्कारावर सादर केलेल्या “शेगावीचा राणा” या रंगीत- संगीत दिंडीला, पंचक्रोशीतील अबालवृद्धांसह परगावचे चाकरमानी आणि माहेरवाशीणी यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उदंड प्रतिसाद दिला. नेत्र दीपक लाईट इफेक्ट्स, हुबेहूब भूमिका आणि यथोचित इतिहासाची ध्वनिफीत,यामुळे उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले. आणि आपोआप सर्वजण महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले. देखाव्याचे सादर करणाऱ्या कलापथकाचे हे यशच मानावे लागेल.

शेगावीच्या गजानन महाराजांनी, त्या प्रतिकूल परिस्थितीत, समाजात वाढलेला अहंकार दूर करण्यासाठी प्रसंगी देहकष्ट घेऊन दांभिकतेवर प्रहार केला. आणि संस्कृती-संस्कारच्या मार्गावर समाजाला आणून ईश्वरभक्तीची शिकवण दिली. शिष्य बंकटलाल याला समाजाने विस्तव न दिल्याने तो परत आला. शिष्यगणांसमोर विस्तवाशिवाय चिलीम पेटवून महाराजांनी समाजाचा अहंकार दूर केला. रिकामी बादली अन कळशी मधून उसाचा ताजा रस पाजून, उन्मत्त पाटील पुत्रांना धडा शिकवला. आणि त्यांना सत्मार्गावर आणले.ब्रह्मगिरी भोंदू बाबांचा गर्व नाहीसा करताना, पलंग आपोआप पेटवून निस्वार्थीपणा आणि दांभिक पणा दूर केला आणि स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करून दाखविले. महाराजांची शिकवण आणि समायोजित अभंग -संगीत आणि कलाकारांनी साकारलेल्या अप्रतिम भूमिका, यामुळे दिंडी पाहण्यास आलेल्या सर्वांना धन्यझाल्याचे समाधान लाभेले.

या देखाव्यामध्ये सिद्धेश कांबळी, स्वप्नील कामत, दीपक कांबळे, देवेश पार्सेकर, मुकेश परब यांनी आपापल्या भूमिका उत्कृष्टपणे साकारल्या. गेली बारा वर्षे नेहमी आपली ट्रिक्सनी युक्त, रंगीत संगीत दिंडी येथील हरिनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी आणून कोंडाघाट बालगोपाळ मंडळाला यांनी सहकार्य केले आहे.दिंडी दरम्यान येणाऱ्या श्रीदेवी माऊली दिंडी पथकातील मित्रपरिवाराचे यावेळी आयोजकांतर्फे कौतुक करून समाधान व्यक्त करण्यात आले. पहाटेपर्यंत चाललेल्या या दिंडीचे तमाम फोंडावासीयांनी उत्स्फूर्त स्वागत केले……..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!