*कोकण Express*
*आ. वैभव नाईक उद्या घेणार जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट*
*सरपंच व लोकप्रतिनिधींच्या समस्या मांडणार*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक हे उद्या शुक्रवार दि. 23 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेणार आहेत. तरी जिल्हा परिषद बांधकाम विभागासंदर्भात सरपंच व लोकप्रतिनिधी यांच्या काही अडचणी, समस्या असतील तर याप्रसंगी त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आ. वैभव नाईक यांनी केले आहे.