सिंधुदुर्ग जिल्हा बँक देशातील सहकारीच नव्हे तर सवर्च बँकासाठी एक आदर्श बँक आहे सातारा जिल्हा बँकेने केले कौतुक

सिंधुदुर्ग जिल्हा बँक देशातील सहकारीच नव्हे तर सवर्च बँकासाठी एक आदर्श बँक आहे सातारा जिल्हा बँकेने केले कौतुक

*कोकण Express*

*सिंधुदुर्ग जिल्हा बँक देशातील सहकारीच नव्हे तर सवर्च बँकासाठी एक आदर्श बँक आहे सातारा जिल्हा बँकेने केले कौतुक*

*सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी)*

नाबार्डच्या धोरणानुसार देशातील पहिल्या क्रमांकाच्या सातारा जिल्हा बँकेने अभ्यास दौ-यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवड केली.सातारा बँकेच्या अधिकारी पथकाने या अभ्यास दौ-याचे अहवाल पत्र पाठवले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने माहीती तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनिय केलेले कामकाज उच्य दर्जाच्या डिजीटल बँकींग सुविधा, अद्यावत डाटा सेंटर, शेतकरी ग्राहक, व्यवसायीक,महीला यांना दिलेल्या कर्ज सुविधा, जिल्ह्याच्या विकासातील योगदान या सर्वामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँक अव्वल असल्याचे कौतुक सातारा जिल्हा बँकेने केले ते आमच्यासाठी प्रेरणादायी असल्याचे मत जिल्हा बॅक अध्यक्ष मनिष दळवी यांनी व्यक्त केले आहे.* सातारा जिल्हा बँकेच्या १३अधिका-यांनी अभ्यास दौ-याचे वेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कर्यालयाला भेटी दिली .व या दौ-याबाबत बँकेचे कौतुक करत तसे पत्र जिल्हा बॅक अध्यक्ष मनिष दळवी यांना पाठवले आहे. नाबार्ड यांच्या धोरणानुसार सातारा बँकेच्या अधिका-यांनी आपल्या बँकेस भेट दिली.माहीती तंत्रण्यान क्षेत्रात बँकेने उल्लेखनिय कामकाज केलेले आहे.बँकेचे डाटा सेंटर अत्यंत अद्यावत असुन सुरक्षा उपाय योजनांची पूर्ण:ता अमलबजावनी केली आहे.ग्राहकांना एटीएम,मोबाइल बँकींग,युपीआय सुविधा देत असुन बँकेच्या डिजीटल बँकींग सुविधा व्यापारी बँकेच्या दर्जाच्या आहेत. जिल्ह्यातील शेतकरी ग्राहक ,व्यवसाईक आणी महीलांना उपलब्द करून देत असलेल्या कर्ज सुविधा उल्लेखनिय आहेत.बँकेच्या मनुष्यबळाचा कौशल्याने वापर करून मनुष्यबळ संसाधन विकसनात केलेले कामकाज अत्यंत प्रशंसनिय आहे.बँकेच्या सर्वांगीण कामकाज पध्दतीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात बँकेचे योगदान महत्वपूर्ण आहे.बँकेच्या विविध योजना आरबीआय व नाबार्डच्या मार्गदर्शक सुचनांची तंतोतंत अममलबजावनी करण्याचे प्रयत्न यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँक देशातील सहकारीच नव्हे तर सवर्च बँकासाठी एक आदर्श बँक आहे. बँकेच्या उल्लेखनिय प्रगतीमध्ये बँकेचे संचालक मंडळाचे मार्गदर्शन,अधिकारी व कर्मचारी वर्गाची कामकाज पध्दती महत्वाची ठरली आहे.बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,संचालक , मुख्यकार्यकारी अधिकारी, संपूर्ण अधिकारी वर्गाने सातारा बँक अधिका-यांना जे मार्गदर्शन केले केले ते सातारा जिल्हा बँकेच्या प्रगतीमध्ये निश्चितच उपयक्त ठरेल असे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे कौतुक करणारे पत्र जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी याना पाठवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!