*कोकण Express*
*कासार्डेत नवरात्रौत्सवानिमीत्त पांरपारिक राज्यस्तरीय ढोल वादन स्पर्धेचे आयोजन*
*कासार्डे :संजय भोसले*
श्री.सिध्दीविनायक नवरात्र उत्सव मंडळ, कासार्डे याच्यावतीने नवरात्रौत्सव निमित्ताने राज्यस्तरीय पारंपारीक ढोल वादन स्पर्धा सोमवार दि. ३ ऑक्टो. २०२२ रोजी कासार्डे तिठ्ठा येथे आयोजित करण्यात आलेली आहे.जिल्ह्यासह राज्यातील ढोल पथकांचे ढोलवादन यावेळी होणार आहे.
या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रु.10,000/-,व्दितीय पारितोषिक रोख रु.5,000/-,तृतीय पारितोषिक रोख रु.3,000/-, उत्तेजणार्थ पारितोषिक रोख रु.2,000/- तसेच उत्कृष्ठ ढोलवादक, उत्कृष्ठ ताशावादक,उत्कृष्ठ झांजवादक यांना प्रत्येकी रोख रु.501/- व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.
सदर स्पर्धा रात्रौ नऊ वाजता सुरू होणार असून प्रत्येक ढोल पथकामध्ये 13 सदस्य असणारे बंधन ठेवण्यात आले आहे यात 8 ढोल,3 ताशे,1 निशान,1 झांज वापरावयाची मुभा आहे.तसेच प्रत्येक पथकाला 20 मिनिटे वेळेचे बंधन असणार आहे.तरी प्रथम दहा येणा-या ढोल पथक स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येणार आहे तरी आपली नावनोंदणी श्री. संतोष कानडे (बुवा),श्री. सहदेव उर्फ आण्णा खाडये 9405358272, रूपेश कानसे 9404395346 याच्याकडे करावी असे आवाहन श्री. सिद्धिविनायक नवरात्र उत्सव मंडळ कासार्डे याच्यावतीने करण्यात आले आहे.
फोटो: ढोलवादन करताना पथक