कोकिसरे रेल्वे फटका जवळ भुयारी ब्रिज ला मंजुरी

कोकिसरे रेल्वे फटका जवळ भुयारी ब्रिज ला मंजुरी

*कोकण Express*

*कोकिसरे रेल्वे फटका जवळ भुयारी ब्रिज ला मंजुरी*

*माजी आमदार प्रमोद जठार यांच्या मागणीला यश*

*कणकवली ः प्रतिनिधी*

गेली अनेक वर्ष बहुचर्चित व बहुप्रतिक्षित असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी – कोकिसरे रेल्वे मार्गावरील भुयारी ब्रिजच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. या कामाची निविदा देखील प्रसिद्ध करण्यात आली असून, गेल्या अनेक वर्षांच्या या मागणीला यश मिळाले आहे अशी माहिती माजी आमदार व भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी दिली. गेली अनेक वर्ष या वैभववाडी तरळे मार्गावरील रेल्वे फटका जवळ ब्रिज करण्याबाबत श्री जठार यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या ना त्या कारणाने हा प्रश्न प्रलंबित राहिला होता. अनेकदा रेल्वे फाटक बंद राहिल्याने दोन्ही बाजूने या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. यासंदर्भात श्री. जठार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर या पाठपुराव्याला यश आले आहे. या संदर्भाची निविदा कोकण रेल्वे कडून प्रसिद्ध करण्यात आली असून, 53 मीटर लांबीचा हा भुयारी ब्रिज होणार आहे. या करिता आर एच गर्डर पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. बॉक्स पुशिंग टेक्नॉलॉजी ने आरसीसी बॉक्स चा वापर हा ब्रिज करता करण्यात येणार आहे. या कामाकरता 16 कोटी 76 लाख 5 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 12 ऑक्टोबर पर्यंत या कामाची निविदा भरण्याकरिता मुदत देण्यात आली आहे. काम पूर्ण करण्याचा कालावधी 18 महिन्यांचा असणार आहे. गेल्या अनेक वर्षांच्या या मागणीला यश आल्याने श्री जठार यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!