*कोकण Express*
*शाळकरी मुलीचा विनयभंग*
*तालुक्यातील एका गावातील घटना ; पोस्कोचा गुन्हा दाखल होणार…!
*कणकवली ः प्रतिनिधी*
तालुक्यातील एका शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एका गावात घडली आहे.याबाबत तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोस्को अंतर्गत त्या संवशयिता विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की पीडित शाळकरी मुलगी बुधवारी दुपारी 1 वा सुमारास शाळेतून घरी निघाली होती.त्यावेळी त्या परिसरातील एक युवक स्कुटीवरुन तेथे आला गाडी वरूनच तू माझ्यावर प्रेम का करत नाहीस अशी विचारणा केली.तिने त्याला प्रतिसाद न देता ती पुढे निघाली.त्यावेळी तिने अति करू नकोस असे म्हणाला.ती घरी जायला निघाली असताना तिचा पाठलाग केला.आणि हात पकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.झाला प्रकार घरी जावून तिने वडिलांना सांगितला असता तिच्या वडिलांनी कणकवली पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे.त्याप्रकरणी सवशयित युवका विरुद्ध विनयभंग व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.याबाबत अधिक तपास महिला उपनिरीक्षक जी.जी.पाटील करत आहेत.