*कोकण Express*
*▪️राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2022 पर्यंत राबविण्याचा शासनाचा निर्णय*
*▪️अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नवीन शासन नियमानुसार मदत निधीचे वितरण*
*▪️पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे,*
*▪️प्रलंबित फेरफार नोंदणीचा निपटला करणे*
*▪️पात्र विद्यार्थ्यांना शिधापत्रिकेचे वितरण*
*▪️नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे*
*▪️तहसीलदार सावंतवाडी श्रीधर पाटील यांचे नागरिकांना आव्हान*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सर्वसामान्य जनतेची कामे विहित कालावधीत व्हावीत याकरीता राज्य शासनाने सण 2015 मध्ये *’आपले सरकार सेवा पोर्टल’* सुरू केले आहे. या माध्यमातून जनतेची कामे विहित कालपर्यंत मर्यादा पूर्ण होणे अपेक्षित आहे ,तथापि सदर पोर्टलचा आढावा घेतला असता, व मंत्रालय स्तरावर नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारीचे अवलोकन केले असता .अनेक प्रकरणी संबंधित नागरिकांचे अर्ज/ तक्रारी यांचा सक्षम प्राधिकारणाकडून विविध काला मर्यादीमध्ये निपटाला होत नसल्याचे निदर्शनास आले .या पार्श्वभूमीवर सर्व प्रलंबित संदर्भ/ अर्ज /तक्रारी यांचा निपटाळा करण्याकरता दिनांक 17 सप्टेंबर 2022 ते दिनांक 2 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत सेवा पंधरवडा राबविण्याचे शासनाने निश्चित केले आहे. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले आहे.