*कोकण Express*
*सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या गणरायाचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतले दर्शन,सावंतवाडी पोलीस निरीक्षक श्री.मेंगडे यांनी केले स्वागत*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
येथील पोलीस कर्मचारी वसाहती मधील विविध समस्या सोडवण्यासाठी लवकरच प्रयत्न केले जातील, पाण्याचा आणि ड्रेनेजचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज पोलीसांना दिले.श्री. केसरकर यांनी आज सावंतवाडी पोलिसांच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या श्री गणरायाचे दर्शन घेतले.यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कर्मचारी वसाहतीत भेडसावणाऱ्या प्रश्नाबाबत श्री.केसरकर यांचे लक्ष वेधले.याप्रसंगी पोलीस निरीक्षक फुलचंद मेगडे यांनी त्यांचे स्वागत केले.