भाजपचे शाफिक खान यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचं घड्याळ बांधलं हाती

*कोकण Express*

*भाजपचे शाफिक खान यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचं घड्याळ बांधलं हाती*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी* 

भाजपचे अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस शाफिक खान यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलंय. त्यामुळे सावंतवाडी तालुक्यात भाजपला मोठा धक्का बसल्याच मानलं जातय.‌ राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थितीत शाफिक खान यांनी हाती घड्याळ बांधलं.

यावेळी राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, पक्षनिरीक्षक अर्चना घारे-परब, अनंत पिळणकर, व्हिक्टर डॉन्टस, अफरोज राजगुरू, सुरेश गवस, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सत्यजित धारणकर, आशिष कदम, हिदायत खान, नवल साटेलकर, चित्रा बाबरदेसाई, अशोक पवार, जावेद शेख, सचिन पाटकर आदींसह राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!