*कोकण Express*
*नगरवाचनालयातर्फे निबंध लेखन
कार्यशाळेचे आयोजन…!*
*लेखन कौशल्यासाठी निबंध लेखन कार्यशाळा उपयुक्त ठरतात-संजीवनी फडके*
*कणकवली ः प्रतिनिधी*
लेखन कौशल्याचा आभ्यास करण्यासाठी निबंध लेखन कार्यशाळा उपयुक्त ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना अशा कार्यशाळांमध्ये सहभागी होऊन लेखन कौशल्य आत्मसात केले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन कार्यशाळा घेण्याचा
नगरवाचनालयाचा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन शिक्षिका संजीवनी फडके यांनी केले.
येथील नगरवाचनालय हॉल मध्ये नालीनगरवाचनालयाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी मराठी निबंध लेखन कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन शिक्षिका श्री. फडके यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह हनीफ पिरखान, सहकार्यवाह डी. पी. तानवडे, सदस्य डी. जे. कांबळे, रवींद्रनाथ मुसळे, वैजयंती
करंदीकर, डॉ. विनायक करंदीकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संजीवनी फडके यांचा नगरवाचनालयातर्फे सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेत संजीवनी फडके यांनी विद्यार्थ्यांना निबंध कशाप्रकारे लिहावा याबाबत मार्गदर्शन केले.
त्यानंतर विद्यार्थ्यांच्या निबंध विषयक असलेल्या शंका-कुशंकांचे फडके यांनी
निरसरण केले. प्रास्ताविक डी. पी. तानवडे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. विनायक करंदीकर यांनी केले. या कार्यशाळेत १६८ हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.