कासार्डे पेट्रोलपंप नजीकच्या रखडलेल्या रस्त्यावरून प्राधिकरन अधिकारी व ठेकेदाराची केली चांगलीच कान उघडनी

कासार्डे पेट्रोलपंप नजीकच्या रखडलेल्या रस्त्यावरून प्राधिकरन अधिकारी व ठेकेदाराची केली चांगलीच कान उघडनी

*कोकण Express*

*कासार्डे पेट्रोलपंप नजीकच्या रखडलेल्या रस्त्यावरून प्राधिकरन अधिकारी व ठेकेदाराची केली चांगलीच कान उघडनी*

*कासार्डे;संजय भोसले*

मुंबई गोवा महामार्गावरील कासार्डे पेट्रोलपंप नजीक असणा-या भूसंपादन अभावी रखडलेल्या महामार्गावरील मुंबईकडे जाताना लेनचा काही भाग व त्याच्या बाजूला असणा-या सर्विस रोडची चर्चा सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती.दरम्यान यानतंर याची दखल घेत शनिवारी सकाळी भाजपा प्रदेश चिटणीस तथा माजी आम.प्रमोद जठार यांनी याठिकाणी व कासार्डे तिठ्ठा येथे पाहणी करुन हायवे प्राधिकरण व ठेकेदार अधिका-यांना खडेबोल सुनावले.तसेच तळेरे बाजारपेठ येथे उडडापूल होसाठी नविन प्रस्ताव तयार करा यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे व आपण स्वत: केंद्रीय मंत्री नाम.नितीन गडगरी यांची भेट घेऊन यासाठी लागणारा निधी मंजूर करुन आणणार असल्याचे सांगत खा.विनायक राऊत यांच्या नाकर्तेपणामुळे तळेरे वासीयांना त्रास सहन करावा लागत असल्याची टीका श्री. जठार यांनी यावेळी त्यांनी केली.

यावेळी हायवे प्राधिकरण उपविभाग खारेपाटणचे उपअभियंत अतुल शिवनिवार, शाखा अभियंता डी.जी. कुमावत,के.सी.सी कंपनीचे अधिकारी अशोक पांडे, याच्यासाह भाजपा पदाधिकारी प्रसाद जाधव,संदीप बांदिवडेकर,सामाजिक कायकर्ते सहदेव उर्फ आण्णा खाडये,गणेश पाताडे,आबू कदम,संतोष राऊत,राजू वरक,राकेश वालावलकर,राजू शेटये यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

सध्या महामार्गावर कलमठ,जानवली, नांदगाव तिठ्ठा,ओटवफाटा,कासार्डे,
खारेपाटण येथील महामार्गावरील भूसंपादन अभावी कामे रखडलेली आहेत.जिल्हात महामार्ग सुसाट झाला असताना प्रलंबित कामामुळे हायवे प्राधिकरण व ठेकेदार कंपनीला आजही खडे बोल सुनावे लागत आहेत.कासार्डे येथे भूसंपादन अभावी रखडलेल्या मार्गाच्या ठिकाणी  ठेकेदार कंपनीने केलेली उपाययोजना अपघाताला निमंत्रण देत असल्याची लक्षात आल्यावर या ठीकाणी रिफलेक्टर व इतर बॅरीगेट लाऊन उपायोजना केल्या होत्या मात्र प्रमोद जठार यांनी शनिवारी घटनास्थाळी पाहणी करत तीन लेनपैकी एक लेन बंद करुन अपघात होणार नाही तसेच वाहने व पादचा-यांना सोईचे होईल अशी उपायोजना करण्यास सांगितले तसेच कासार्डे तिठठा येथिल ब्रीज खालील भाग सिमेंट क्रॉक्रीट करण्याबरोबर खारेपाटण ते कलमठ भागातील प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्यात यावीत असे आदेश दिले.

तळेरेत होणार उडडाणपूल : प्रमोद जठार (बाॅक्स)

तळेरे बाजापेठेचे दोन भाग झालेले असून यामुळे तळेरेतील नागरीकांसह येथिल व्यावसायिक तसेच मुंबई गोवा व विजयदुर्ग कोल्हापूर हे दोन राष्ट्रीय मार्ग या ठिकाणी जोडत असल्याने अडचणी लक्षात घेता तळेरे उडडापूल होणे गरजेचे आहे.तसेच तळेरे हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने तळेरे बसस्थानक ते बाजापेठ बॉक्सवेल पर्यंत उडडापूल मंजूर करुन आणण्याची जबाबदारी आता माझी असून यासाठी नविन प्रस्ताव तयार करुन केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मी स्वत: जाऊन नाम.नितीन गडकरी यांना विशेष बाब म्हणून मंजूर आणणार असल्याचे सांगत हायवे प्राधिकरण व ठेकेदार कंपनीने तातडीने वरीष्ठ पातळीवर अंदाजपत्रक व प्रस्ताव सादर करण्यास सांगितले

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!