*कोकण Express*
*पंतप्रधानांच्या वाढदिवसा निमीत्त दिवीजा वृद्धाश्रमास माजी आमदार प्रमोद जठार यांच्या वतीने वाॅशिंग मशीन भेट*
*कासार्डे;संजय भोसले*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून राज्यात सेवा व समर्पण अभियान राबवून साजरा होत असताना भाजपा प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार प्रमोद जठार याच्यावतीने कणकवली तालुक्यातील असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमात भेट देत वृध्दाश्रमासाठी वाॅशिग मशिन वृध्दाच्या सेवेप्रती देण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, माजी सभापती मनोज रावराणे,दिलीप तळेकर,माजी पं.स.सदस्या हर्षदा वाळके,असलदे सरपंच गुरूप्रसाद उर्फ पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, तोंडवली- बावशी सरपंच मनाली गुरव, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, नगरसेविका मेघा गांगण, राजन चिके, समीर प्रभुगावकर,उपसरपंच संतोष परब,नीरज मोरये,भाई मोरजकर,दामोदर नारकर,शामराव परब,संतोष परब,राजू तांबे,अवधूत गगनग्रास, परशुराम परब,रामचंद्र लोके गुरुजी, बाबाजी शिंदे,कमलेश पाटील,प्रसाद जाधव,संदिप बांदिवडेकर, आण्णा खाडये, रोहित महाडिक आदी उपस्थित होते.
देशाचे कणखर पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिसानिमित्त दिविजा वृध्दाश्रम येथे माजी आमदार प्रमोद जठार यांच्या माध्यमातून वृद्धाश्रमातील गरज लक्षात घेता वॉशिंग मशीन तसेच भाजपा पदाधिकारी याच्याकडून जीवनावश्यक साहित्य वाटप करून येथील आजी आजोबांबरोबर प्रमोद जठार यानी संवाद साधून आपुलकीने विचारपूस केली.तसेच जि. प.केंद्रशाळा नं.१ नांदगाव येथे भाजपा तर्फे शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. यावेळी मान्यवरांसह ऋषिकेश मोरजकर व शिक्षकवर्ग उपस्थित होते.