पीजीडी इन जर्नलिझमच्या परीक्षेत दारोमच्या संजय भोसलेंचे घवघवीत यश

पीजीडी इन जर्नलिझमच्या परीक्षेत दारोमच्या संजय भोसलेंचे घवघवीत यश

*कोकण Express*

*पीजीडी इन जर्नलिझमच्या परीक्षेत दारोमच्या संजय भोसलेंचे घवघवीत यश..*

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या वतीने घेण्यात आलेल्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ऑनलाइन डिजिटल जर्नालिझम या डिजिटल क्षेत्रातील महत्त्वाच्या पदवीत्तर डिप्लोमा परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दारुम येथील रहिवाशी संजय भोसले यांनी 83.66% (फर्स्ट क्लास वुईथ डिस्टिंगशन मध्ये) गुण मिळवून जिल्ह्यातील पत्रकारितेचा सन्मान केला आहे.
संजय भोसले हे गेले वर्षभर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे प्रत्येक विकएंडला जाऊन, शंभर टक्के उपस्थिती दर्शवणारे आणि हा कोर्स पुर्ण करणारे जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थी ठरले आहेत. त्यांना अध्यासनाचे प्रमुख प्रोफेसर डॉ. शिवाजी जाधव, प्रोफेसर व ग. गो. जाधव आध्यासनाचे माजी विभाग प्रमुख रत्नाकर पंडित ,प्रोफेसर मतीन शेख ,अभिजीत गुर्जर,प्रोफेसर व आवाज इंडियाचे चिफ् प्रशांत चुयेकर ,प्रोफेसर सुशांत उपाध्ये,सुमित कदम, अक्षय दळवी, प्राध्यापिका सुमेधा घाटगे, प्रोफेसर श्री. बोराटे, आदींचे विशेष मार्गदर्शन लाभले.तसेच जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार माधव कदम व तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ अध्यक्ष दत्तात्रय मारकड यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
श्री. संजय भोसले हे कासार्डे माध्यमिक विद्यालयात सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असून ते गेली अनेक वर्षांपासून मुक्त पत्रकारितेचा छंदही जोपासतात. ते जिल्ह्यातील अनेक वर्तमानपत्रांत तसेच सोशल मीडियामध्ये तळेरे‌ प्रतिनिधी म्हणून काम पाहित आहेत.
याशिवाय महाराष्ट्र योगासना स्पोर्ट्स असोसिएशन सिंधुदुर्गचे जिल्हा कार्यकारणीत तांत्रिक सल्लागार असून ,पतंजली योग समिती सिंधुदुर्गचे ॲक्टिव्ह सदस्य आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्वच थरातून अभिनंदन होत आहे.

संजय भोसले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!