*कोकण Express*
*राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्यावर हल्ला…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
व्हॉटसअप ग्रुप मधून एकाला काढून टाकल्याचा राग आल्याने एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यानी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात घुसत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्यावर हल्ला केला आहे.
याबाबत पुंडलिक दळवी यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी या प्रकाराची चौकशी करून त्या हल्ला करणाऱ्या युवकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.