*कोकण Express*
*घोणसरीत पंतप्रधान मोदींजीच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना रेनकोट व खाऊचे वाटप*
*सावली जनसेवा शिक्षण वरवडे माध्यमातून रेनकोट वाटप*
*भाजपा युवा मोर्चा तालुका सदस्य नितीन पारकर यांचा पुढाकार*
देशाचे लाडके पंतप्रधान मान. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावली जनसेवा शिक्षण संस्था वरवडे कणकवली या संस्थेमार्फत घोणसरी गावातील शाळा नं.३ व ४ येथील विद्यार्थांना रेनकोट वाटप तसेच भारतीय जनता पार्टी घोणसरी च्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच सौ मृणाल पारकर, भाजपा कणकवली तालुका उपाध्यक्ष छोटू पारकर,भाजपा तालुका युवा मोर्चा सदस्य नितीन पारकर,तंटामुक्ती अध्यक्ष बाळकृष्ण राणे,भाजपा बूथ अध्यक्ष संजय शिंदे,माजी सरपंच दिपक एकावडे,भाजपा बूथ सचिव उमेश राऊत,भाजपा किसान मोर्चा बूथ अध्यक्ष विजय एकावडे, दिगंबर एकावडे,शाळेचे मुख्याध्यापक श्री.दिलीप कागले, श्री.निनावे, शिषक श्री.पंडित,अंगणवाडी सेविका सौ.जंगम,मदतनीस श्रीमती.राणे आदि उपस्थित होते.