*कोकण Express*
*ओझोन थर म्हणजे पृथ्वीची संरक्षक ढाल*
*मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कराराची अंमलबजावणी केल्यास ओझोन थर चिरंतन राहील ; प्रा. ज्ञानोबा फड*
कला आणि वाणिज्य महाविद्यालय फंडाघाट मधील आयक्यूएसी, भूगोल आणि वाणिज्य विभागा अंतर्गत आंतरराष्ट्रीय ओझोन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. ज्ञानोबा फड तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू फुलझेले यांनी हे होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. ज्ञानोबा फड आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, ओझोनचे रेणुसूत्र 03 आहे. हा वायू फ्लोरिंन, क्लोरीन आणि कार्बन पासून बनलेला एक मुख्य वायू आहे. हा ओझोन थर निर्माण होण्याची प्रक्रिया निरंतर सुरू आहे. ओझोनचा थर पृथ्वीच्या सनस्क्रीमचे काम करतो. त्याचबरोबर जवळजवळ 98% हानिकारक सूर्यापासून येणारी अतिनील किरणे शोषून घेतो. म्हणजेच सूर्यकिरण ऑक्शिजांच्या रेणूंना एकाच अणूमध्ये विभाजित करतात तेव्हा वातावरणात ओझोन तयार होतो. ऑक्सिजन दोन अणूनी बनलेल्या ऑक्सिजन रेणूवर अल्ट्राव्हायोलेट प्रकाशाच्या क्रियेमुळे ओझोन तयार होतो.
या ओझोनच्या थरामुळे पृथ्वीवरील सर्व मानवी जमात, प्राणी इतर जीव जंतू त्याचबरोबर वनस्पती यांचे संरक्षण होत असते. परंतु आज वेगवेगळ्या उद्योगधंद्यांच्या विकासामुळे, औद्योगीकरणामुळे तसेच शहरीकरणामुळे अनेक प्रकारची प्रदूषके वातावरणात सोडली जातात. त्यामुळे या ओझोनचा ऱ्हास होताना दिसून येत आहे. 16सप्टेंबर 1987 रोजी स्वीकारलेला Mountrial Protocol हा करार पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या कराराला अनेक देशानी पाठिंबा दिलेला आहे. म्हणून आज ओझोन थराचे संरक्षण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे.
भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजाराम पाटील यांनी ओझोन विषयी अधिक सखोल माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, यासाठी पीपीटीच्या सहाय्याने पृथ्वीच्या बाह्य विभागातील,
वातावरणातील विविध स्तर,ओझोनचा थर, त्याचे स्थान यांची रंगीत छायाचीत्रे, आकृतीच्या माध्यमातून सादरीकरण केले.
अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू फुलझेले म्हणाले, तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आजच्या मानवाने दैनंदिन वापरामध्ये अनेक वस्तूंचा उपयोग भौतिक गरजा भागविण्यासाठी केलेला आहे. कीटकनाशकांची फवारणी विविध प्रकारचे स्प्रे, विविध प्रकारच्या इंधनाचे ज्वलन, दगडी कोळशाचे ज्वलन, त्यामधून निर्माण होणारे धूर व वायू हे तसेच घरगुती फ्रिज, एशी या उपकरणामधून क्लोरोफ्लोरोकार्बन वातावरणात मिसळतो. म्हणजेच पर्यावरणामधील ओझोनच्या ऱ्हासास मानवी क्रिया या प्रामुख्याने जबाबदार असलेल्या पहावयास मिळतात. म्हणून ओझोनचा ऱ्हास कमी करण्यासाठी विद्यार्थी, समाज, त्याचबरोबर प्रत्येक देशांमध्ये जनजागरण मोहिमा त्याचबरोबर स्वतः जास्तीत जास्त ओझोन विषयी माहिती घेऊन, आपण जीवन जगल्यास निश्चितपणे आंतरराष्ट्रीय ओझोन दिन साजरा केल्याचे आपल्याला समाधान मिळेल. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. बाजीराव डाफळे सर, तर पाहुण्यांची ओळख, स्वागत तसेच सूत्रसंचालन भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजाराम पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. नम्रता मंचेकर मॅडम यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी बहुसंख्य संख्येने उपस्थित होते.