*कोकण Express*
*विजयदुर्ग रत्नागिरी बोरीवली बससेवा कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची राष्ट्रीय रेल संघटना शेगांव संघटनमंत्री ओमकार माळगांवकर यांची मागणी*
*देवगड ः प्रतिनिधी*
विजयदुर्ग रत्नागिरी बोरीवली बससेवा कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव संघटनमंत्री यांची महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील विजयदुर्ग हे महत्वाचे ठिकाण असुन वेगाने विकसित होणारे प्रसिद्ध गाव आहे या गावातील लोक व्यापार,व्यवसाय,नोकरीनिमित्त माहीम,माटुंगा,बांद्रा,विलेपार्ले ,अंधेरी,गोरेगाव,मालाड,कांदिवली,बोरीवली,परिसरात कार्यरत आहेत विजयदुर्ग परिसरातील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी पुरेसं बससेवा उपलब्ध नसल्याने ही बससेवा कायमस्वरूपी सुरू ठेवावी अशी मागणी करण्यात आली आहे ही बससेवा कायमस्वरूपी ठेवल्याने पर्यटन,एसटी प्रवासी संख्येत व उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल अशी मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव श्री.ओमकार उमाजी माळगांवकर यांनी प्रादेशिक वाहतुक महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांच्याकडे केली आहे
याप्रसंगी उप महाव्यवस्थापक श्रीनिवास जोशी,वाहतुकचे दिगंबर भडकमकर,विभाग नियंत्रक सौ यामीनी जोशी,शिपाई सौ दामिनी कदम आदी अधिकारी व मान्यवर उपस्थित होते