*कोकण Express*
*कणकवली अर्बन निधी बँक लिमिटेड च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी मा. रंजन चव्हाण यांची निवड*
*कणकवली ःःप्रतिनिधी*
भारत सरकार मान्य वित्तीय संस्था कणकवली अर्बन निधी बँक लिमिटेड बाजारपेठ कणकवलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी त्रिंबक गावचे सुपुत्र मा.रंजन चव्हाण यांची निवड करण्यात आली अल्पावधीतच कणकवलीकरांच्या विश्वासास पात्र ठरलेली कणकवली अर्बन निधी बँकेच्या ग्राहक संख्येमध्ये कमालीची वाढ झाली आहे. पिग्मी, आर. डी., ठेवी,कर्ज पुरवठा व बँकेच्या आकर्षक योजना कणकवली अर्बन बँक राबवीत आहे. सभासदांना सहकार्य होण्यासाठी पूर्ण वेळ मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची नेमणूक केल्याने ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे
कणकवली अर्बन निधी बँकेचे सन्माननीय सल्लागार व ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सन्मानपूर्वक नेमणूक करण्यात आली, यावेळी कणकवली अर्बन निधी बँकेचे चेअरमन प्रा.हरीभाऊ भिसे, व्हाईस चेअरमन प्राचार्य डॉ.सुभाष सावंत, खजिनदार श्री. प्रितम पारकर, संचालिका सौ. प्राची पारकर, बँक ऑफिसर सौ.प्रांजल राणे, सौ. भारती तांबे, यश घाडीगांवकर, अस्मा पटेल, सौ.दिव्या केणी, सौ. पूजा तोरस्कर आणि अभय सरमळकर आणि संचालक मंडळ उपस्थित होते