*कोकण Express*
*भास्कर जाधव यांनी आपल्या तोंडाला आवर घालावा अन्यथा शिवसेना स्टाईल ने बंदोबस्त करू*
*अन्यथा भास्कर जाधवांना सिंधुदुर्गात फिरू देणार नाही – सुनील पारकर*
*सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी*
मंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्ह्याचे किंगमेकर आहेत. रत्नागिरीसह सिंधुदुर्गात मंत्री सामंत यांना पूर्ण पाठिंबा आहे. रत्नागिरीतील शिल्लक सेनेच्या सभेत मंत्री सामंतांवर खालच्या भाषेत शिवराळ टीका केली, त्याचा आम्ही निषेध करतो. भास्कर जाधव 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीचे तिकीट नाकारले म्हणून पुन्हा मतोश्रीचे तोंड पाहणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा करणाऱ्या भास्कर जाधव यांच्या तोंडी निष्ठेच्या बाता शोभत नाहीत अशी घणाघाती टीका करतानाच भास्कर जाधव यांनी आपल्या तोंडाला आवर घालावा अन्यथा शिवसेना स्टाईल ने त्यांचा बंदोबस्त करू, त्यांना सिंधुदुर्गात फिरू देणार नाही असा इशाराही शिवसेना शिंदे गटाचे सुनील पारकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी माजी जि प सदस्य संदेश पटेल, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, शेखर राणे आदी उपस्थित होते. शिवसेना युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा शिल्लक पेंग्विन सेनेचे युवराज अशी संभावना करून सुनील पारकर यांनी आदित्य ठाकरेंनाही चिमटा काढला.
2009 ला शिवसेनेने विधानसभेचे तिकीट नाकारले तेव्हा पुन्हा मातोश्री चे तोंड देणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा भास्कर जाधव यांनी केली होती. नंतर ते अपक्ष निवडणूक लढले आणि हरले. त्यांनतर राष्ट्रवादी त प्रवेश करत मंत्री झाले. राष्ट्रवादीने त्यांना प्रदेशाध्यक्ष केले.त्यानंतर पुन्हा सेनेत गेले. नेतेपद मिळाले म्हणजे एखादे मोठे मंत्रिपद मिळाल्यासारखे भास्कर जाधव बेताल वक्तव्य करत आहेत. मातोश्रीला खुश करण्यासाठी आमचे नेते उदय सामंत यांच्याबद्दल अशी बेताल वक्तव्य केलात तर सिंधुदुर्गात फिरू देणार नाही असेही सुनील पारकर यांनी ठणकवून सांगितले.