*कोकण Express*
*शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांचा शिंदे गटात प्रवेश ; उद्योगमंत्री सामंतांच्या उपस्थितीत मुंबईत केला प्रवेश*
*मालवणमध्ये शिंदे गटाचा शिवसेनेला धक्का,अमोल लोके, सुनील जोईल ही शिंदे गटात.*
*सिंधुदुर्ग*
शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा माजी मालवण तालुकाप्रमुख बबन शिंदे यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करून शिंदे गटात डेरेदाखल झाले आहेत. तसेच देवगड चे अमोल लोके आणि कातवण ग्रा पं सदस्य सुनील जोईल हे सुद्धा शिंदे गटात सामील झाले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय आंग्रे संदेश पटेल माजी नगरसेवक भूषण परुळेकर आदी उपस्थित होते
बबन शिंदे यांचा आमदार वैभव नाईक यांच्या आमदारकीच्या वेळी निवडणुकीत विजयाच्या वेळी सिंहाचा वाटा होता मालवण तालुक्यात वैभव नाईक यांच्या विजयासाठी बबन शिंदे यांनी मोठी मेहनत घेतली होती मागील काही वर्षात त्यांच्यावर शिवसेना उपजिल्हाप्रमुखांची जबाबदारी सोपवण्यात आली होती आज बबन शिंदे यांनी मुंबईत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला त्यामुळे मालवण तालुक्यात शिंदे गटाची ताकद वाढू लागली आहे.