*कोकण Express*
*मालवण तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिरवंडे हायस्कूलचे यश*
४९वे मालवण तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन वराडकर हायस्कूल कट्टा येथे संपन्न झाले. या प्रदर्शनात त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेने दुहेरी यश प्राप्त केले आहे. माध्यमिक गटात कु. राज उत्तम गांवकर याने सादर केलेल्या पाण्याची बचत-काळाची गरज या प्रतिकृतीला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. या प्रतिकृतीची जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली. तर विज्ञान शिक्षक श्री. व्ही डी काणेकर यांनी सादर केलेल्या शिक्षक निर्मित शैक्षणिक साहित्यास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. गेली अनेक वर्षे विज्ञान प्रदर्शनात शिरवंडे हायस्कूला यश प्राप्त होत असून याही वर्षी यशाची परंपरा कायम राखली आहे. या यशाबद्दल संस्था अध्यक्ष श्री. बाबू बाणे, उपाध्यक्ष श्री. अच्युत भावे, कार्याध्यक्ष श्री. शंकर घाडीगांवकर सरचिटणीस श्री. तुषार राऊत,शालेय समिती अध्यक्ष श्री उत्तम गांवकर, सहचिटणीस श्री. अशोक भावे, सह चिटणीस श्री. विजय घाडीगांवकर, खजिनदार श्री. भाऊराव घाडीगांवकर श्री. पंढरीनाथ भावे, , श्री. सचिन गांवकर, श्री. प्रभाकर पारकर, श्री. प्रशांत गांवकर, श्री. संतोष गांवकर, श्री. दिपक चव्हाण, श्री. दशरथ घाडीगांवकर, मुख्याध्यापक श्री. वामन तर्फे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.