*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्या प्रतीदिन १ लाख लिटर दुध संकलनाच्या दिशेने ; मनिष दळवी*
*कुडाळ ःःप्रतिनिधी*
जिल्ह्यातील उपलब्ध कृषी साधन सामग्रीचा उपयोग करून येथील युवकांना सक्षम करण्यासाठी दुग्ध व्यवसाय महत्वाचे साधन आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायाच्या वाढीसाठी आम्ही सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी राहू अशी ग्वाही जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
माणगाव खोऱ्यातील निवजे येथील तरुण शेतकऱ्यांनी हरियाणा येथून दुधाळ म्हैशी आणून दुग्ध व्यवसायातून आपला आर्थिक विकास साधण्यासाठी जिल्हा बँकेच्या आर्थिक सहकार्याने व्यवसाय सुरु केला त्या शेतकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, संचालक प्रकाश मोर्ये, महेश सारंग, गजानन गावडे,सरपंच सौ.पालव, दीपक नारकर, नागेश आईर, प्रभाकर सावंत, डॉ. प्रसाद देवधर, गोकुळ दूध संघाचे सर्व अधिकारी, व नीवजे ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी दळवी यांनी सह्याद्री पट्ट्यातील शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय साठी पुढे येऊन हरीयाणा येथून दुधाळ जनावरे खरेदी करुन दुग्ध व्यवसाय सुरु केला हे कौतुकास्पद असून तरुण व ज्येष्ठ नागरिक या व्यवसायात उतरता आहे. म्हणजेच हा व्यवसायाला शाश्वत व या व्यवसायात यशस्वी होण्याची खात्री आहे. जिल्हा बँकेने गोकुळ दूध संघ, भगीरथ प्रतिष्ठान यांच्या सहकार्यांने जिल्ह्यात प्रती दिन एक लाख लिटर दुध उत्पादन करण्याचा संकल्प केला आहे त्या संकल्पाच्या पुर्ततेच्या दिशेने निवजेतील शेतकऱ्यांच्या माध्यमातुन ही झालेली सुरुवात आहे. निवजे गावातील हा प्रकल्प जिल्ह्यासाठी पथदर्शी ठरेल गोकुळच्या माध्यमातून जनावर खरेदी, गोठा व्यवस्थापन, चारा, आदी अनेक बाबतीत येथील शेतकऱ्यांना अनुदानाच्या योजना असुन त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळ आदीच्य सहकार्याने काही पात्र शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक सक्षम होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक सदैव तुमच्या पाठीशी आहे असे प्रतिपादन मनिष दळवी यांनी केले. यावेळी डॉ. प्रसाद देवधर यांनी येथील शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायातून मोबदला मिळाल्यानंतर हुरळून न जाता जिल्हा बँकेच्या आर्थिक सहकार्याचे भान ठेवावे. व आपल्या ज्येष्ठ शेतकऱ्यांच्या सहकार्याने आर्थिक सक्षम व्हावे. भगीरथ प्रतिष्ठान आपल्या नेहमी पाठीशी आहे. यावेळी जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी आपल्या दुग्ध व्यवसाय अनुभवातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.