*कोकण Express*
*स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट कणकवली च्या मार्फत चित्रकला परीक्षा कार्यशाळा संपन्न*
*कणकवली ः प्रतिनिधी*
स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट कणकवली च्या माध्यमातून नुकतीच आर्ट वर्ल्ड क्लास, टेमवाडी कणकवली येथे एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांकरिता कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या उदघाट्न प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती कणकवलीचे गटविकास अधिकारी
सन्माननीय श्री. अरुण चव्हाण साहेब, विद्यामंदिर हायस्कूलचे कलाशिक्षक सन्माननीय श्री. प्रसाद राणे सर, सन्माननीय श्री व्ही व्ही सावंत सर,सन्माननीय श्री. शंकर राणे सर (कलाशिक्षक), सन्माननीय श्री केदार टेमकर सर कुडाळ (कलाशिक्षक), स्वयंदीप ट्रस्टचे अध्यक्ष श्री. संदीप सावंत, सेक्रेटरी श्री. संतोष सावंत, अॅड .मनीषा सावंत,अॅड .अग्निवेश तावडे,कु.तनिष्का सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते
कार्य शाळेविषयी माहिती देताना संदीप सावंत म्हणाले की दिनांक 28 29 31 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर यावेळी होणाऱ्या चित्रकला परीक्षेविषयी मुलांना योग्य प्रकारे मार्गदर्शन मिळावे व त्यांना परीक्षा देत असताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे व कश्या प्रकारे पेपर सोडवला पाहिजे याची माहिती मिळावी यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या पुढेही संस्था अशा प्रकारचे मुलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे.
श्री अरुण चव्हाण गटविकास अधिकारी पंचायत समिती यांनी आपल्या भाषणाच्या वेळी बोलताना म्हणाले की संस्थेने हे मुलांसाठी केलेले कार्य खूप प्रशंसनीय आहे आणि अशा प्रकारची कार्यशाळा होणे हे मुलांच्या दृष्टीने खूप खूप महत्वाचे आहे. संस्थेच्या पुढील कामाकरिता त्यांनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले संस्था करीत असलेल्या विकासात्मक कार्यासाठी सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
श्री प्रसाद राणे सर यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणा मध्ये स्थिरचित्र, स्मरणचित्र, डिझाईन, अक्षर लेखन व भूमिती या सारख्या विषयांची माहिती मुलांना चांगल्या प्रकारे दिली. परीक्षे मध्ये पेपर सोडवताना कशाप्रकारे सोडवावा, त्यातील बारकावे कसे पहावेत, निरीक्षण करणे याविषयी सखोल माहिती दिली. तसेच पेपर सोडवताना कोण कोणती काळजी घेतली पाहिजे, वेळचा वापर कसा केला पाहिजे याची उत्तम माहिती मुलांना दिली. आपल्याजवळ असलेल्या साहित्याचा वापर कमी वेळात कशा प्रकारे करू शकतो हेही सांगितले. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मुलांना मार्गदर्शन केले आणि परीक्षेसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
कलाशिक्षक शंकर राणे सर व केदार सर यांनी मुलांना स्थिरचित्र,स्मरणचित्र व डिझाईन यांची प्रात्यक्षिक मुलांना दाखवलीय व माहिती दिली. तसेच मुलांकडून करून घेतले. मुलांनी काढलेल्या चित्रावर त्यांनी बारकाईने लक्ष देऊन काही चुका आहेत व कुठे भर दिला पाहिजे यावर मार्गदर्शन केले व होणाऱ्या परीक्षा बाबत त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले व यापुढेही आपल्याला मदतीची गरज असेल तेव्हा आम्ही कायम तुमच्या सेवेसाठी उपलब्ध राहू अशी ग्वाही दिली.
कुमारी ऋतुजा शिरवलकर,रत्नेश जातेकर व जुही टोनेमारे या मुलांनी आपल्या मनोगतामध्ये आपल्याला या कार्यशाळेमध्ये तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. त्याचा आम्हाला फायदा झाला व आपण या येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा कसा लाभ घेऊ हे व्यक्त केले. आम्ही आपल्या या कार्यशाळेमध्ये भागघेतल्या मुळे याचा आम्हाला खरोखरच भरपूर फायदा होणार आहे व त्यांनी संस्थेला याबाबत धन्यवाद दिले.
पालकांनीही अशा प्रकारची कार्यशाळा होणे हे गरजेचे होते व आपण आमच्या मुलांना चित्रकला या कार्यशाळेचे आयोजन करून एक चांगली संधी निर्माण करून दिल्याबद्दल त्यांनीही संस्थेला धन्यवाद दिले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचा समारोप प्रसंगी अॅड .अग्निवेश तावडे उपस्थित होते. ते मुलांनी काढलेली चित्रे पाहून भारावून गेले. त्यांनी मुलांचे व मार्गदर्शक शिक्षकांचेही कौतुक केले. तसेच मुलांना आव्हान केले कि तुम्ही अश्याप्रकारच्या संधीचा पुरेपूर वापर करून घ्या व भविष्य मध्ये उज्वल यश संपादन करा. संस्थेलाही त्यांनी एक चांगले कार्य हाती घेतल्या बद्दल शुभेच्छा दिल्या
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी तनिष्का सावंत हिने केले व प्रस्तावना संदीप सावंत यांनी केली. कार्यक्रमाचे आभार संस्थेचे सेक्रेटरी संतोष सावंत यांनी व्यक्त केले. या संपूर्ण कार्यशाळेचे नियोजन मनिषा सावंत व शंकर राणे सर यांनी केले होते.