*कोकण Express*
*कासारर्डे येथील पुलावरील वरील धोकादायक वळण लवकरात लवकर ठीक करावे*
*मनसेचे लॉटरी विक्रेता सेना अध्यक्ष गणेश कदम यांची मागणी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आधी विनायक मेटे आणि काल परवा उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या झालेल्या मृत्यूमुळे रस्त्यांवर होणारे अपघात चर्चेत आले आहेत.
उपरोक्त फोटो हा मुंबई-गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासार्डे (ता. कणकवली) गावातील आहे. मुंबईकडे येताना कासार्डे तिठ्यावरील उड्डाण पुलावरून तळेऱ्याच्या बाजूला उतरताना पहिली मार्गिका ही अशी चंद्रकोरीच्या आकारात कापण्यात आली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी ट्रक सारखे वाहन पहिल्या मार्गिकेवरून वेगाने आल्यास पुढे रस्ताच नाही हे लक्षात न आल्याने किमान दीड ते दोन फूट खाली असलेल्या सर्विस रोडवर उलटण्याची शक्यता आहे. याठिकाणी सर्विस रोड सरळ रेषेत पुढे आणून पुलाच्या तिन्ही मार्गिका नीट बांधणे शक्य होते व ही दुरुस्ती अजूनही करता येईल. कारण सर्विस रोडला लागून एक छोटे झाड वगळता कोणतेही बांधकाम नाही.
याची वेळीच दखल घेऊन रस्ते विभागाने तातडीने ही दुरुस्ती करावी, अन्यथा कासार्डे उड्डाण पुल हा अपघातासाठी केलेली व्यवस्थाच ठरेल!