*कोकण Express*
*कणकवली पंचायत समितीचा निर्णय*
*सभापती दिलीप तळेकर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
प्राथमिक च्या सर्व शिक्षकांची कोरोना टेस्ट करा आणि त्या नंतरच ऑफलाईन शिक्षण दया.शाळेत मुलांना बोलवून अध्ययन करू नका.तो प्रकार घटक ठरेल.तालुक्यात ५ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत.कणकवली तालुक्यात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोना टेस्ट केल्याशिवाय घरोघरी जाऊन शिकविण्याची पद्धत अमलात अणुनये अशी भूमिका कणकवली सभापती दिलीप तळेकर यांनी घेतली आहे.कणकवली पंचायत समितीच्या वतीने हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
कणकवली पंचयत समिती सभापती दिलीप तळेकर यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी उपसभापती सौ.दिव्या पेडणेकर,पंचयत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण,गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, सरपंच हेमंत परुळेकर, आदी उपस्थित होते. २३ जून ते ७ ऑक्टोबर या काळात तालुक्यात शिक्षण आपल्या दरी कार्यक्रम घेतला त्यानंतर थांबविला.काही दिवसांपासून शिक्षण अधिकाऱ्यांनी ५०टक्के उपस्थितीत शाळा चालू केल्या.मात्र गेल्या आठ दिवसात ५ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह झाले.
जोपर्यंत शासन निर्णय होत नाहीत तो पर्यंत कोणतीही शाळा चालू करू नका.कारण जर मूले कोरोना पॉझिटिव्ह झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार ? राज्य सरकारने प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला नसतांना ही घाई का ? ९ वी ते १२ वीच्या शाळा चालू करतांना सर्व शिक्षकांच्या कोरोना चाचण्या केल्या मात्र प्राथमिक शिक्षकांच्या अशा कोणत्याही टेस्ट नकरता शाळा का चालू करता.कणकवली तालुक्यात आज उपचार घेत असलेले ७० लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे जो पर्यंत शासन निर्णय होत नाही तो तोपर्यंत तालुक्यातील शाळा चालू करू नका.मुलांना शाळेत घेऊन अभ्यास देण्यापेक्षा मुलांना ऑनलाईन शिक्षण द्या,शिक्षकांच्या आस्थापनात जे काम करायचे आहे ते सुरू ठेवा मात्र मुलांना शाळेत घेऊ नका.आज शिक्षक पॉझिटिव्ह आले उद्या मुले कोरोना पॉझिटिव्ह आली तर त्याला जबाबदार कोण असा सवालही सभापती दिलीप तळेकर यांनी केला.