*कोकण Express*
*यावेळेसचा मोरया मॅशअप सोबत : कला दिग्दर्शक सुमित पाटिल यांची अनोखी कला*
*कासार्डे ः संजय भोसले*
सुमित पाटील यांची क्रिएटिव्हिटी म्हणजे इंक्लुजिविटी व सस्टेनिबिलिटी यांचा मिलाप आहे. दरवर्षी, श्री. सुमित पाटिल आणि त्यांच्या टीमद्वारे केल्या जाणाऱ्या इको-फ्रेंडली गणेशोत्सव सजावटीची उत्सुकता सर्वांनाच असते. बेवरेजसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील रिओ इनोबेवसोबत मिळून त्यांनी टाकाऊपासून टिकाऊ अशा कॅन्सची गणेश मूर्ती तयार केली आहे.
यावर्षीदेखील, त्यांनी एका नवीन प्रयोगाच्या स्वरूपात आपली क्रांतिकारी कला सादर केली आहे. बेवरेजसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील रिओ इनोबेवसोबत मिळून त्यांनी टाकाऊपासून टिकाऊ अशा कॅन्सची गणेश मूर्ती तयार केली आहे.
सस्टेनिबिलिटी, क्रिएटिव्हिटी व नवीन मॅशअप ही ब्रँडची काही महत्वाची मूल्ये आहेत. रिओ बबली फ्रुट ड्रिंक याच मूल्यांचे प्रतिनिधित्व करते. पर्यावरण संरक्षणासाठी पूरक असणाऱ्या रिओ बबली फ्रुट ड्रिंक कॅन्सचा वापर करून गणेश मूर्ती तयार करण्यात आली आहे.
“सस्टेनिबिलिटी हा नेहमीच रिओचा अविभाज्य भाग राहिला आहे. त्यामुळे अल्युमिनियम कॅन्ससारखे पर्यावरणपूरक पॅकेजिंग असावे यावर आमचा नेहमीच भर राहिला आहे. यातील प्रत्येक कॅनचा पुनर्वापर करता येईल”, श्री. राहुल सांगोई, रिओ सीईओ.
“रिओ बबली फ्रुट ड्रिंक मॅशअपच्या कल्पनेशी सुसंगत आहे, याचा आम्हाला आनंद आहे. आपण विविध कल्पनांचा वापर करून नवीन निर्मिती ही करू शकतो व त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनातही हातभार लावू शकतो. ही गणेश मूर्ती म्हणजे डेकोरेशन साहित्य, कॅन्स, प्रेम आणि क्रिएटिव्हिटीचा मॅशअपच आहे.” असं सुमित पाटील म्हणाले.