*कोकण Express*
*काकीवर बलत्कार केल्याच्या आरोपातून पुतण्याची निर्दोष मुक्तता*
*आरोपीच्यावतीने ऍड. प्राजक्ता शिंदे यांनी काम पाहिले*
*कणकवली/प्रतिनिधी*
पंदूर येथील बलत्कार प्रकरणातील संशयित आरोपी अमोल जाधव याची जिल्हा सत्र न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने ऍड. प्राजक्ता म. शिंदे यांनी काम पाहिले.
याची हकीकत अशी की,
फिर्यादी महिलेने आपल्यावर आपल्याच पुतण्याकडून बलत्कार झाल्याच्या घटनेची फिर्याद कुडाळ पोलीस स्टेशनला दिली. या फिर्यादीमध्ये संशयित आरोपी अमोल जाधव याने आपल्यावर बलात्कार केला असल्याचे नमूद करण्यात आले होते. सदर फिर्यादीवरून संशयित आरोपी अमोल जाधव याच्या विरुद्ध कुडाळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये संशयित आरोपी अमोल जाधव याने 24 डिसेंबर 2021 रोजी फिर्यादी महिलेच्याच्या राहत्या घरात जाऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलत्कार केला. अशा आशयाची फिर्याद नोंद करण्यात आली.
सदर फिर्यादी वरून संशयित आरोपी अमोल जाधव याच्या विरुद्ध न्यायालयात दोषारोप ठेवण्यात आला होता.
सदरची केस ओरोस येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या कोर्टात चालली. सदर केस मध्ये एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीमधील विसंगती तसेच सबळ पुराव्याचा अभाव त्याचबरोबर फिर्याद देण्यास झालेल्या विलंबाचे कोणतेही समर्पक कारण नसणे आदी गोष्टी लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपी अमोल जाधव याची निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्या वतीने अँड. प्राजक्ता शिंदे यांनी युक्तिवाद केला.