*कोकण Express*
*कोकण कट्टाने पालघर येथील साई आधार संस्थेचेच्या निराधार बालकांना घडवले विलेपार्ले येथील गणेश दर्शन ; निकेत पावसकर*
*मुंबई ःःप्रतिनिधी*
विलेपार्लेच्या सामाजिक सर्वांगीण विकासासाठी अग्रेसर असलेल्या कोकण कट्टा या बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पालघर मधील भाताणे आदिवासी पाड्यातील साई आधार संस्थेच्या बालकांना शनिवार दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता प्रथम श्री स्वामी समर्थ मठात दर्शन घेऊन विलेपार्ले मधील सार्वजनिक गणेशोत्सवाचे दर्शन घडविण्यात आले.
विलेपार्ले येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी या आदिवासी मुलांना दर्शनासाठी आमंत्रित केले होते. या मंडळात सुभाष रोड सार्वजनिक गणेशोत्सव,मोंघीबाई मार्केट सार्वजनिक गणेशोत्सव, विलेपार्ले लोकसेवा मंडळ, हनुमान रोड, मुंबईचा पेशवा गणेशोत्सव, भारतीय कामगार सेना पुरस्कृत कामगारांचा विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ, पारसी वाडा सार्वजनिक गणेशोत्सव, विलेपार्लेचा राजा गणेशोत्सव, वीर सावरकर सेवा केंद्र आदी मंडळाच्या गणेशांचे दर्शन घडवले यामधील मुंबईचा पेशवा, मोघींबाई मार्केट, विलेपार्ले लोकसेवा मंडळ आदी मंडळानी या आदिवासी पाड्यातील प्रत्येकी ५०००/ रुप्यांची मदत केली कोकण कट्टाने मानवतेच्या दृष्टिकोनातून राबविलेल्या उपक्रमांमुळे आदिवासी पाड्यातील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता कोकण कट्टाच्या या सेवाभावी कार्याचा सर्व स्तरातून स्वागत होत आहे अशी माहिती कोकण कट्टा चे संस्थापक अजित पितळे यांनी दिली. यावेळी दादा गावडे, सुजित कदम, सुनील वनकुंद्रे, दया मांडवकर, सागर मालप, समीर देसाई आकांक्षा व शलाका पितळे आरती दाभोळकर नीता पेंगणकर पूजा तळेकर आधी सदस्य उपस्थित होते.
या काही मुलांच्या पायात चपलाही नव्हत्या त्या सदस्यांनी तात्काळ घेऊन दिल्या… मोदक आयस्क्रीम चा प्रथमच आस्वाद घेऊन आनंदी झाले तर विमान तळावर विमान दर्शन घेताना स्वर्ग सुख दिसल्याचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता.