*कोकण Express*
*भिरवंडे , नाटळ , हरकुळ खुर्द ,नागवे सोसायटींच्या धान्य वाटपाची चौकशी करा….!*
*सांगवे ग्रामस्थांची तहसीलदार रमेश पवार यांच्याकडे मागणी;सांगवे सोसायटी धान्य दुकान चालू करा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील भिरवंडे , नाटळ , हरकुळ खुर्द , नागवे या विविध कार्यकारी सोसायटींची तपासणी करा.सांगवे वि.वि.कार्यकारी सोसायटी सांगवे धान्य दुकानाची बदनामी थाबवण्यात यावी.गावातील १२५ कुटूंबांना कोणत्याही प्रकारचे धान्य मिळत नाही त्यांना देणगी रुपात मिळालेले धान्य वाटले जात असताना आणि त्याची माहिती सर्व जनतेला माहीत असतांना मुद्दामहून काही लोकणांनी गाडी पकडण्याचे नाटक केले व सोसायटीची बदनामी केली. त्यामुळे या सर्व प्रकरणात सोसायटीची होणारी बदनामी थांबवा धान्य दुकान सुरु करा ,अशी मागणी तहसिलदार यांचेकडे ग्रामस्थांनी निवेदन देऊन केली. सांगवे विविध कार्यकारी सोसाटीची तक्रार आल्यानंतर आपण सांगवे धान्य दुकानाची चौकशी केलेली आहे . त्यामध्ये आमच्या सोसायटीची बदनामी झालेली आहे . आमच्या सोसायटीमध्ये विविध उपक्रम आम्ही राबवत असतो . उदा . भात खरेदी , कांदा विक्रि हि सोसायटी कणकवली तालुक्यामध्ये एक नंबरची सोसायटी आहे . आपण भिरंवडे,नाटळ, हरकुळ खु.,नागवे या सोसायटींची रास्त दुकानाच्या धान्य दुकानासकट तातडीने तपासणी करावी , अन्यथा आम्ही आपल्या कार्यालयासमोर उपोषणला बसणार आहोत . हि विनंती . सांगवे सोसायटीचे धान्य दुकानातले धान्य भिरवंडे गावातील शिवसैनिकानी तसेच कनेडी येथील दारू विक्रेता लॉरेन डिसोजा आणि मोतेस खून प्रकरणातील बेनी डिसोजा यांनी धान्याची गाडी अडवून धान्याच्या गाडीच्या आडवी गाड़ी लाऊन गाडीची चावी काढून घेतली तसेच ड्राईवर ठार मारण्याची धमकी दिली . हे धान्य सांगावे गावातील ग्रामस्थ आणि इतर देणगीदार यांनी धान्य जमवून जे ध्यानापासून गावात लोक वंचित आहेत अशा लोकांना धान्य वाटण्यासाठी हा टेम्पो धान्य घेऊन जात होता. तो टेम्पो अडवलेला आहे . सोसायटीच्या धान्य दुकानाचा आणि टेम्पोतील धान्याचा कोणताही संबंध नाही . तरी मेहबारणी करून धान्य दुकानाची बदनामी करणे थांबवावे व संबधीता वर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. यावेळी माजी सभापती सुरेश सावंत, सांगवे सरपंच मयुरी मुंज, उपसरपंच प्रदीप सावंत, पंचायत समिती सदस्य स्मिता मालडीकर,माजी सरपंच महेश सावंत, विजय भोगटे, प्रफुल्ल काणेकर,रायमन घोणसालविस,सोसायटी चेअरमन कृष्णा वाळके,राजेश सापळे,धकु रेवडेकर,सुनील तोरोस्कर,पुंडलिक पवार,मधुकर गावकर,अनिल चिंदरकर, अजित सावंत,दीपक नांदगावकर, कुलदीप सावंत,प्रसाद सावंत, सुभाष सावंत, आदी सह शेकडोग्रामस्थ उपस्थित होते.