*कोकण Express*
*फोंडाघाट आर. के. ग्रुप तर्फे संगीत भजन स्पर्धेचे आयोजन*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
सलग आठव्या वर्षी फोंडाघाटच्या श्रीदेव राधाकृष्ण मंदिर “अखंड हरिनाम सप्ताह” महोत्सव निमित्त १५ ते १७ सप्टेंबर रोजी,रात्री आठ वाजता, “संगीत भजन” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.प्रथम येणाऱ्या भजन मंडळांना प्रथम संधी देण्यात येणार असून, मंडळाची संख्या निश्चित केली जाणार आहे. तरी आपला सहभाग नोंदवण्यासाठी संघानी वेळेवर श्रीकांत पारकर (९४०३५५८१७१/९६५७०५८६७१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.