*कोकण Express*
*कणकवली तालुक्यात भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप*
*कणकवली ः प्रतिनिधी*
तालुक्यात गौरी-गणपतींचे मोठ्या भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषांनी बाप्पांना निरोप देण्यात आला. कोरोनाकाळानंतर या वर्षीचा गणेश उत्सव निर्बंधमुक्त झाला. त्यामुळे उत्साहाचे वातावरण होते. तसेच मोठ्या प्रमाणावर चाकरमानी गावी दाखल झाले होते. गणपतींचे आगमन ३१ आँगस्टला झाले. त्यापाठोपाठ गौरींचे आगमन झाले. सहा दिवस गणपतींची षडोपचारे पुजा आर्चा करण्यात आली.
भजन, आरती, फुगड्यांनी रात्री जागवण्यात आल्या. पाच दिवसांच्या सेवेनंतर आज गणपती व गौरींचे विसर्जन करण्यात आले. ठिकठिकाणी भव्य मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. ढोल ताशा गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला. काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने भजने करण्यात आली. बापाला निरोप देण्यासाठी ठिकठिकाणी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. गणेश उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती.