*कोकण Express*
*आंबोलीतील बटरफ्लाय पार्क पावसाळ्यानंतर*
शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती*
*आंबोली ःःप्रतिनिधी*
आंबोली येथे उभारण्यात आलेले बटरफ्लाय पार्क हे पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. तसेच यावेळी त्यानी त्याच परिसरात प्रसिद्ध शास्त्रज्ञ मार्सेलिन अल्मेडा यांनी संग्रहित केलेल्या पानांच्या विविध प्रकारांच्या अभ्यास करणारे हार्बेरियम सेंटर देखील उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मंत्री दीपक केसरकर यांनी आज जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या समवेत आंबोलीतील विविध प्रलंबित राहिलेल्या कामांची पाहणी केली त्या ठिकाणी भेट देऊन त्यांनी संबंधितांना आवश्यकता सूचनाही केल्या