कणकवलीच्या शिवसेना नगरसेविका माही परूळेकर शिवसेना शिंदे गटात

कणकवलीच्या शिवसेना नगरसेविका माही परूळेकर शिवसेना शिंदे गटात

*कोकण Express*

*कणकवलीच्या शिवसेना नगरसेविका माही परूळेकर शिवसेना शिंदे गटात*

*माजी जि. प. सदस्य संजय आग्रे यांनी केले स्वागत*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली नगरपंचायतीच्या शिवसेना नगरसेविका माही परुळेकर यांच्यासहित शहरातील व लगतच्या गावांमधील महिलांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. माजी जि. प. सदस्य संजय आग्रे यांनी या सर्वांचे स्वागत केले.

आमची शिवसेना ही अधिकृत शिवसेना आहे. आमच्या शिवसेनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन लवकरच होणार आहे. या उद्घाटनाला मुख्यमंत्री यावेत, असा आमचा प्रयत्न आहे. तसेच जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख व इतर पदाधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. गणेशोत्सवानंतर या नियुक्त्या होतील. याच दरम्यान कार्यालयाचे उद्घाटनही होईल, अशी माहिती माजी जि. प. सभापती संदेश पटेल यांनी दिली. सर्वसामान्य जनतेचे हे सरकार असून लोककल्याणाचे काम करत असताना कुणाला काहीही अडचणी आल्यास आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयामार्फत या कार्यालयात दोन स्वीय सहाय्यकही असणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी भास्कर राणे, सुनील पारकर, बाळू पारकर, संजय पारकर, ए.पि. सावंत, भूषण परुळेकर, दामू सावंत (जाणवली), सुनील हरमलकर, चिन्मय राणे, दीपक राऊत (निरोप), शेखर राणे, अमित सावंत (तरंदळे), संदेश पटेल, राजन म्हाडगुत (कणकवली), दिलीप घाडीगावकर, अतुल दळवी, प्रमोद सांगवेकर, विजय खरात, राजू कासले, मारुती सावंत, बाबू आचरेकर, संजय आग्रे, निलेश तेली, अनिल खोचरे, अनिप सावंत पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तर प्रिया टेंबकर यांच्या नेतृत्वाखाली दर्शना घाडीगावकर, सुवर्णा गुरव, सारिका गुरव, प्रमिला चव्हाण, तुलसी पालकर, सुधा कुडतरकर, हिराबाई धनवटे, रेखा धनवटे, ज्योती धनवटे, रितू शिरसाट, अनिता कुडतरकर, आनंदी कोरगावकर, अनुष्का पवार यांनी शिवसेना शिंदेगटात प्रवेश केला.

यावेळी भास्कर राणे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळणार असल्याचा विश्वास प्रवेश कर्त्यांना दिला. तसेच कोणत्याही प्रकारच्या समस्या असो किंवा काही मदत असो आम्हाला कळवा आम्ही जिल्ह्यातील जनतेसाठी नेहमीच सक्रिय असू असा विश्वासही शिवसेना शिंदेगटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

ll

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!