*कोकण Express*
*शालेय क्रीडास्पर्धा तात्काळ सुरु करणारच -* क्रीडामंत्री गिरीश महाजन*
*शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघास दिले आश्वासन*
*कासार्डे;संजय भोसले*
कोरोना काळात सुरक्षेचा उपाय म्हणून शालेय क्रीडा स्पर्धांना स्थगिती होती. मी शालेय जीवनापासून स्वतः खेळाडू असून खेळाडू हीत लक्षात घेता शालेय क्रीडा स्पर्धा या झाल्याच पाहिजेत. त्यामुळे तात्काळ शालेय क्रीडा स्पर्धा या सुरुच करणार व या बाबत याच आठवड्यात निर्णय घेतला जाईल असे मत क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महामंडळाचे शिष्टमंडळाने क्रीडामंत्री यांची भेट घेतली त्या वेळी ते बोलत होते, अशी माहिती राज्य कोअर कमिटी सदस्य तथा जिल्हा अध्यक्ष बयाजी बुराण,राज्य युवा सचिव दिनेश म्हाडगूत यांनी दिली.
मध्यंतरीच्या काळात रखडलेले खातेवाटप नंतर विधीमंडळाचे अधिवेशन यामुळे शालेय क्रीडा स्पर्धांना परवानगी मिळणेस उशीर होत होता.स्कूल गेम फेडररेशन ऑफ इंडिया मध्ये दोन गट पडल्याने केंद्रिय क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना स्थगिती दिली होती. मात्र क्रीडामंत्री यांच्या उपस्थितीत दोन्ही गटाच्या सदस्यांची ॲडहॉक कमिटी स्थापन करण्यात आली असून उशीरने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार असल्याचे कळते. त्या धर्तीवर राज्यात शालेय क्रीडा स्पर्धांना परवानगी देऊन स्पर्धा पार पाडण्यात याव्यात अशी विनंती डॉ प्रदिप तळवलकर, राजेश जाधव, कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे, डॉ रणजित पाटील, प्रा हरिश शेळके, प्रा ईकबाल मिर्झा, गिरीश पाटील,डॉ.क्षितीज भालेराव, डॉ आसिफ खान, विलास पाटील, प्रविण पाटील, प्रेम खोडपे, डी. के.चौधरी आदींनी मंत्री महोदयांना केली. राज्य संघटनेच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी मंत्री महोदयांच्या कार्यालयाशी संपर्क करून निवेदन सादर केले आहे .
———————————–
चौकट
*स्पर्धा बंद असल्याने खेळाडूंच्या करिअर परिणाम!*
शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडूंसाठी लाईफलाईन
याच स्पर्धा बंद असल्याने खेळाडूंच्या करीअर वर परिणाम होऊ शकतो. प्राविण्याला मिळणारे नोकरीतील आरक्षण, अकरावी प्रवेश कोटा, ग्रेस गुण, राष्ट्रीय शिष्यवृत्ती या पासून खेळाडू वंचित राहू शकतात. स्पर्धा सुरु करून लाखो खेळाडूंच्या राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या स्वप्नांना भरारी द्यावी.
श्री.दत्तात्रय मारकड
*राज्य समन्वयक*
महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ महामंडळाचे शिष्टमंडळ