बीच क्लिनिंग मशीनचा मालवणात शुभारंभ ; वैभव नाईकांनी हाती घेतलं स्टेअरिंग

बीच क्लिनिंग मशीनचा मालवणात शुभारंभ ; वैभव नाईकांनी हाती घेतलं स्टेअरिंग

*कोकण Express*

*बीच क्लिनिंग मशीनचा मालवणात शुभारंभ ; वैभव नाईकांनी हाती घेतलं स्टेअरिंग !*

*जिल्ह्याच्या किनारपट्टीला होणार लाभ ; बीच स्वच्छतेसाठी यानंतरच्या काळातही प्रयत्नशील*

*आमदार वैभव नाईक यांची ग्वाही ; माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंचे मानले आभार*

*मालवण ः प्रतिनीधी*

पर्यटकांना भुरळ घालणारे येथील समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या बीच क्लिनिंग मशीनचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते रविवारी मालवण बंदर जेटी येथे करण्यात आला. येथील समुद्र किनारे स्वच्छ ठेवणे ही नागरिकां बरोबरच प्रशासनाची देखील जबाबदारी आहे. त्यानुसार पर्यटकांना येथे आकर्षित करण्यासाठी बीच स्वच्छतेसाठी यानंतरच्या काळातही प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी दिली. दरम्यान, आ. वैभव नाईक यांनी स्वतः या वाहनाचे स्टेअरिंग हाती घेत किनारपट्टी स्वच्छतेत स्वतःचे योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!