वागदे येथील महामार्गाच्या दुसऱ्या लेनचे काम सुरू!

वागदे येथील महामार्गाच्या दुसऱ्या लेनचे काम सुरू!

*कोकण Express*

*वागदे येथील महामार्गाच्या दुसऱ्या लेनचे काम सुरू!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

वागदे येथील हळवल फाटा येथे काल झालेल्या अपघातानंतर मुंबई गोवा महामार्गाच्या बंद असलेल्या लेनचा प्रश्न ऐरणीवर आला होता. सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर ठेकेदार दिलीप बिल्डकॉनला बंद असलेली लेन सुरु करण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज महामार्गाची बंद असलेली लेन सुरु करण्यासाठी दिलीप बिल्डकॉनचे कर्मचारी हजर झाले असता वागदे सरपंच रुपेश आमडोस्कर व जमीन मालक महादेव घाडीगावकर यांनी स्वतः उपस्थित राहून दिलीप बिल्डकॉनच्या कर्मचाऱ्यांना लेनवरील खडी, साईड पट्टीवरील मातीचे ढीग हटविण्याबाबत त्याचबरोबर रोड सेफ्टी साठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर, बाळा आर्डेकर, शिरीष घाडीगावकर, प्रकाश घाडीगावकर, अनिकेत गुरव, विजय घाडीगावकर, दीपक गोसावी सुरेश रगजी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!